जिल्हा संपादक नांदेड दिनांक -02 डिसेंबर 2023
हिमायतनगर तालुक्यातील मागील दोन दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे सद्या ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा फटका हरभर आणि तुर या पिकांना बसत आहे. शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. अवकाळी पावसामुळे कापूस पिकांचे नुकसान झाले आहे. फुटलेला कापुस पावसामुळे भिजुन गेला आहे. भिजलेल्या कापसाचे भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शेतीवर होणारा भरमसाठ खर्च पाहता, अपेक्षित उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत नाही. अतिवृष्टी आणि पिक विम्याचे पैसे अजुन मिळाले नाहीत. कपासीचा उतारा प्रतिबॅग एक ते दिड क्विंटल येत आहे. अशातच हरभरा, तुर पिकांवर अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.