मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक – 16 /10/2023
नांदेड जिल्ह्यातील बिलोली व कुंडलवाडी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनेलने मा. खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या नेतृत्वाखाली लडविलेल्या पॅनेलने जोरदार विजय मिळविला आहे.
कै. बाबाराव एंबडवार (नांदेड जिल्हा परिषद मा. अध्यक्ष ) यांचे जेष्ठ चिरंजीव सुनिलभाऊ एंबडवार यांनी नुकत्याच पार पडलेल्या कुंडलवाडी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी, व तसेच बिलोली तालुक्यातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व तथा बेळकोणीचे पोलीस पाटील कै. साहेबराव पाटील बुद्धेवार यांचे नातू राजेश्वर रामकिशन पाटील बुद्धेवार यांची कृषी उत्पन्न बाजार समिती बिलोलीच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनपर रा. पु. प्राप्त संभाजी आलेवाडसर व पेरकेवाड समाज बांधवांच्या वतीने नवनिर्वाचित संचालकाचा सत्कार करण्यात आला.
या निवडीचे स्वागत हिमायतनगर तालुका पेरकेवाड समाज संघटनेच्या वतीने मा.सभापती, सरपंच,चेअरमन परमेश्वर गोपतवाड, जिल्हा सचिव दिलीपराव अनगुलवार, सामाजिक कार्यकर्ते राजेश्वर अनगुलवार, तालुका अध्यक्ष आनंदराव मुतनेपाड, उपाध्यक्ष संतोष संभाजी अनगुलवार, तालुका सचिव मारोती अक्कलवाड पाटील, मा. सरपंच दत्ता गटकेपोड, आदींनी अभिनंदन केले आहे.