योगेश घायवट भूमीराजा जिल्हा प्रतिनिधी
प्रतिनिधी, 14 सप्टेंबर 2023 रोजी,भारतासारख्या कृषी प्रधान देशामध्ये बैलपोळा सणाचे विशेष महत्त्व आहे अकोल्यापासून जवळ असलेल्या रिधोरा गावांमध्ये पारंपारिक रित्या बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गावातील शेतकरी आपल्या परिवारा सोबत बैलांचे पूजन करून पोळ्यामध्ये घेऊन येत असतात व गावामध्ये मोठ्या थाटात ढोल ताशांच्या गजरात शेतकरी आपल्या बैलांना घरापासून वाजवत गाजवत पोळ्यामध्ये आणत असतात व तोरणाखाली एका रांगेत उभे करत असतात सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास जिल्हा परिषद शाळेजवळ गावांतील सर्व बैलजोड्या आल्या होत्या *बैलांचे मनोभावे पूजन रिधोरा गावचे सरपंच मा. श्री. विशाल भाऊ दंदी वंचित बहुजन युवा आघाडी बाळापूर तालुका उपाध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले व प्रथम क्रमांकाच्या जोडी मालकाच्या मा. गणेश रामदास पांडे यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला* त्यानंतर झडत्यांचा सूर गावातील शिवारात दणाणला होता व *सरपच मा. विशाल भाऊ दंदी यांनी तोरण तोडून पोळा फुटल्याचे जाहीर केले* फटाके फुटले, तोरणे तुटले आणि बैल घराकडे सरसावले गावामध्ये बैलांची मिरवणूक निघाली पोळ्यात गेलेले बैल गावातील घरोघरी जातात घरी येणाऱ्या प्रत्येक बैलाची सहकुटुंब सह बैलाचे पाय धुवून पूजन करून नंतर बैलराजाला पुरणपोळीचा नैवद्य खाऊ घातला जात असतो अश्या प्रकारे बैल पोळा रिधोरा गावामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ग्रापंचायत सदस्य, पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार, व गावातील नागरिकांनी यांनी केली कृतज्ञता व्यक्त करून बैलपोळा हा सण मोठा उत्साहात साजरा करतात आला…
*- रणजीत भिमराव तायडे*
*(प्रसिद्धी प्रमुख)*
*वंचित बहुजन युवा आघाडी बाळापूर*