Home Breaking News उप अधिक्षक भुमी अभिलेख हिमायतनगर तर्फे स्वामित्व योजने अंतर्गत बोरगडी येथे गावठाण...

उप अधिक्षक भुमी अभिलेख हिमायतनगर तर्फे स्वामित्व योजने अंतर्गत बोरगडी येथे गावठाण च्या मोजमापाची ई प्राॅपर्टी कार्ड चे वाटप….

तहसीलदार आदित्य शेंडे* *यांच्या हस्ते ई-प्रॉपर्टी कार्ड चे वाटप …

भुमिराजा ग्रामीण तालुका प्रतिनिधी/ माधव काईतवाड बोरगडीकर

हिमायतनगर:- तालुक्यातील श्रीक्षेत्र बोरगडी येथे भुमी अभिलेख विभाग उप अधिक्षक भुमी अभिलेख विभाग हिमायतनगर मार्फत स्वामित्व योजने अंतर्गत श्रीक्षेत्र बोरगडी येथील गावठाण चे ड्रोनच्या साह्याने मोजमाप करण्यात आले होते.आज दि २५/८/२०२३ रोजी बोरगडी येथे हिमायतनगर चे तहसीलदार अदिंत्य शेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ई प्राॅपर्टी कार्ड चे वाटप करण्यात आले.यावेळी उपस्थित गावकऱ्यांचा वतीने सरपंच प्रतिनिधी सुधाकर पुंडलिक काईतवाड यांच्या हस्ते तहसीलदार  आदित्य शेंडे यांचा सत्कार करण्यात आला. तद्नंतर तहसीलदार शेंडे साहेब उपस्थित गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले केंद्र सरकारने चालु केलेली स्वामित्व योजना म्हणजे काय?
देशातील सर्वच भागात जमिनी बाबतच्या मालकी हक्काबद्दल नेहमीच वाद उद्भवत असतात. तसेच, गरिबांच्या जमिनींवर जबरदस्तीने कब्जा केल्याची प्रकरणे देखील पहायला मिळतात. इत्यादी सारख्या गोष्टींचा विचार करून केंद्र सरकारने देशपातळीवर स्वामित्व योजना राबविण्याचा संकल्प केला आहे. स्वामित्व योजने अंतर्गत देशातील सर्व ग्रामीण भागातील जमिनींचे ड्रोनद्वारे मोजमाप केले जाईल आणि गावातील प्रत्येक मालमत्तेचा डिजिटल नकाशा तयार केला जाईल. उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे त्या संबंधित ओपन मालकाला त्याच्या जमीन मालकीचे प्रमाणपत्र (ई-प्रॉपर्टी कार्ड) देणे म्हणजेच स्वामित्व योजना होय.ते यावेळी शेतकऱ्यांना ई पिक पाहणी या विषयी मार्गदर्शन करताना म्हणाले.आपल्या शेतातील पिक पेरा नोंद हि स्वतः शेतकऱ्यांनी मोबाईल फोन ॲप द्वारे करुन घ्यायची आहे.या कार्यक्रमास हिमायतनगर तालुक्याचे तहसीलदार  अदित्य शेंडे,नायब तहसीलदार .सुर्यकांत ताडेवाड,
भुमिअभिलेख उप अधिक्षक  आर मोरे,व्ही.सी.आडे,
तलाठी पुणेकर साहेब, ग्रामसेवक पवन जाधव,
सरपंच प्रतिनिधी सुधाकर पुंडलिक काईतवाड,दगडुजी काईतवाड,साई कट्टावाड,संजय काईतवाड,मा.पोलीस पाटील श्रीरंग काईतवाड,श्यामराव राठोड,विलास चव्हाण,लक्ष्मण भैरैवाड,सह गावातील नागरिक उपस्थित होते.

Previous articleग्रामसेवकांची हजेरी बायोमैट्रिक प्रणालीने लागू करण्याबाबत ग्रामविकास विभागाच्या महाराष्ट्रातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना पत्राव्दारे सुचना..
Next articleअखेर जलंब येथे मुंबई हावळा मेल व सुरत अमरावती एक्सप्रेसला थांबा मंजुर.