अखेर युवाशक्ती ग्रामविकास संगठनच्या पाठपुराव्याला यश*
अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी
खामगाव:-महाराष्ट्रातील जवळपास ९०% ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक ठरलेल्या कामाच्या दिवशी किंवा कार्यालयीन वेळेत कधीही ग्रामपंचायतमध्ये हजर राहत नाही, यामुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक त्रासून गेलेले आहेत व ग्रामसेवकांच्या अशा बेजबाबदारपणामुळे ग्रामविकासासाठी शासनाकडून आलेला लाखों रुपयांचा निधी सुद्धा परत जातो कारण त्या निधीतून कामे करण्यासाठी ग्रामसेवक ग्रामपंचायतला हजर राहत नाहीत.ग्रामसेवकांच्या या मनमर्जी कारभाराला लगाम लावण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने युवाशक्ती ग्रामविकास संगठनने संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या ३२ जिल्ह्यातील जिल्हा संघटनांच्या माध्यमातून ग्रामसेवकांना बायोमॅट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्यासाठी डिसेंबर २०२१ पासून शासन दरबारी निवेदने देत सतत पाठपुरावा केला. अखेर ग्रामविकास मंत्रालयाने युवाशक्ती ग्रामविकास संगठनच्या वतीने ०६ जून २०२३ रोजी मुख्य सचिव ग्रामविकास विभाग महाराष्ट्र राज्य यांना दिलेल्या निवेदनाची दखल घेत २४ ऑगस्ट २०२३ रोजी महाराष्ट्रातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या नावे पत्र क्र.संकीर्ण-२०२३/प्र.क्र.४५३/आस्था-७ काढत ग्रामसेवकांना नियमानुसार बायोमॅट्रिक प्रणालीने हजेरी लागू करण्यासाठी सूचना दिलेली आहे. युवाशक्ती ग्रामविकास संगठनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच सदस्यांनी ग्रामविकास विभाग महाराष्ट्र राज्याचे आभार मानले व लवकरच ग्रामसेवकांना बायोमॅट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावरून सुद्धा सक्तीने अमलबजावणी करण्यात येइल ही अपेक्षा व्यक्त केली.
*युवाशक्ती ग्रामविकास संगठनचे संस्थापक/अध्यक्ष इमरान पठाण, सचिव पुरुषोत्तम सदार व महाराष्ट्रातील सर्व जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी तसेच सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि, ग्रामविकास विभागाच्या सुचने नंतरही जर पुढील ०३ महिन्यात प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवकांच्या हजेरीसाठी बायोमॅट्रिक प्रणाली सुरू करण्यात आली नाही तर आता या विषयासाठी युवाशक्ती ग्रामविकास संगठनकडून राज्यभर आंदोलन करण्यात येइल.* :- अजयसिंह राजपूत (तालुकाध्यक्ष खामगाव)
*युवाशक्ती ग्रामविकास संगठन, महाराष्ट्र राज्य.*