**रविवार विशेष **
**जिल्हा संपादक नांदेड**
**दिनांक – 13 /08/2023**
*प्रत्येक माणसाच्या आठवणी या अशा का असतात, ओंझळ भरलेल्या पाण्या सारख्या, नकळत ओंझळ रीकामी होते, आणी मग उरतो फक्त ओलावा, प्रत्येक दिवसाच्या आठवणीचा. मनातले गैरसमज जाळून टाकले की, नात्यातील तणावाची राख होते.*
*आपला स्वभाव असा असावा की, सहवासाची जाणीव नाही झाली, तरी पण दुराव्यात उणीव भासली पाहिजे. आपल्या आयुष्याचा प्रवास सहज, आणि सोपा करण्यासाठी, आपल्या अपेक्षांचे ओझे कमी करा…!!*
*देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो. त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो. आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज नसते. तो सर्वांना दिसत असतो. म्हणुन मंदीरातला देव एकवेळ टाळला तरी चालेल. पण कर्मातला देव कधीही टाळु नका…!*
*जसा श्वास हा जीवन जगायला गरजेचा असतो…! तसाच विश्वास हा आयुष्य जगायला तेवढाच गरजेचा असतो. प्रतिष्ठा आणि धनाशी जोडलेली माणसे नेहमी तुमच्या पुढ्यात उभी राहतील. पण जी माणसे तुमची वाणी, विचार आणि आचरणाशी जोडलेली असतील ती सदैव तुमच्या पाठीशी उभी असतील…!!*
*आकाशातील ग्रह पृथ्वीवरील माणसावर परिणाम करतात की नाही याबद्दल साशंकता आहे. मात्र पृथ्वीवरील माणस एकमेकांबद्दल जे ग्रह करून घेतात, ते मात्र माणसाच्या जीवनावर निश्चित परिणाम करतात.*
*तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल, तितकंच सुखी तुम्ही रहाल. आपल्या विषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मनं शांत ठेवुन पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल…!*
*वाटेवर चालताना खूप लोक कमवायचे पैशांनी गरीब राहिलो, तरी चालेल. पण मनाने मात्र कायम श्रीमंत राहायचंय. आयुष्यात कोण कस वागलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातून तुम्ही काय शिकलात आणि पुढे काय करावं लागेल हे डोक्यात ठेवा. कुणी आपल्यावर थोडेसे उपकार केले तर आपण त्याच्यावर ढीगभर परोपकार करण्याची तयारी ठेवा ! आपली संस्कृती वाटून खाण्याची आहे, ओरबाडून घेण्याची नाही. सावली देणारे कधीच परतफेडीची अपेक्षा करत नाहीत…! मग ते वटवृक्ष असो, की आई वडील…!!*
*भरवसा आणि आशिर्वाद कधी दिसत नाहीत, परंतु अशक्य गोष्टीलाही ते शक्य करतात. समोरचा समजून घेणारच नसेल तर आपलं सांगणं आणि त्याचं ऐकणं दोन्हीही व्यर्थ आहे. समोरची व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवतो हिच आपल्या जीवनातील सर्वात मोठी सफलता असते. शब्दांनाही स्वतःचे असे तापमान असते ते कोणत्या वेळी कसे वापरले जातात यावरून कळते की ते शब्द जळणार आहेत की थंडावा देणार आहेत. देह सर्वांचा सारखाच फरक फक्त विचारांचा या छोट्याशा आयुष्यात स्वतःला असे बनवा की लोक तुमच्याकडे एकमेव उपाय म्हणून पाहतील पर्याय म्हणून नाही.*
*माणसानं काय काय कमावलं आहे, याची यादी जरी इतरांजवळ असली, तरी आपण काय काय गमावलं आहे, याची यादी मात्र ज्याची त्याच्याजवळच असते. प्रचंड संयम लागतो, नाती टिकवायला नाही तर दुनिया तयारच आहे, महाभारत पहायला..*
*जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते, तीच गोष्ट तुमच्यात बदल घडवू शकते, भले यशस्वी होण्याची खात्री नसेल. परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे.*