शेगाव प्रतिनिधी :-डॉक्टर अश्विनीताई बोरसे राष्ट्रीय अध्यक्ष एमजीएम प्रतिभाताई मस्के सरचिटणीस एमजीएम सुरेश पवार सर अध्यक्ष गिरणा गौरव प्रतिष्ठान यांच्या अध्यक्षतेखाली शितल शेगोकार राहणार शेगाव जिल्हा बुलढाणा यांची गिरजा महिला मंच गिरणा गौरव प्रतिष्ठान जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आभाळाने नाकारलेल्या पंखांना विरहाचे सामर्थ द्याव उपेक्षितांना साधनांचे पाठबळ देत संधीच कवाड खुली करावी. लोकहिताचे आत्मभान द्यावे आणि विश्वास व आपुलकीच्या निर्मितीतून लोक केंद्र संविधानाचा पाया मजबूत करत महिलांना महिलांसाठी लोकाभिमुख आश्वासक व्यासपीठाची निर्मिती गिरणा गौरव प्रतिष्ठानने महाराष्ट्र राज्य गिरणा महिला मंचमाच्या माध्यमातून निर्माण केले निपक्षनी धर्म निर्गवी निस्पृह आणि निर्वाज्य लोकसेवेतून उभ्या राहणाऱ्या महिलांच्या या व्यासपीठावर आपली जिल्हाध्यक्षपदी निवड करताना आम्हास आनंद होत आहे असे गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवारजी सर यांनी बोलताना म्हटले महिलांच्या सर्वांगीण विकासाला आपण नक्कीच हातभार लावून संघटन आरोग्य शिक्षण कला उद्योग अधिक क्षेत्रात महिलांना समृद्ध बनविण्यासाठी प्रयत्न कराल अशी अपेक्षा गिरणा गौरव प्रतिष्ठानचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अश्विनीताई बोरस्ते, प्रतिभाताई मस्के सरचिटणीस यांनी शितलताई शेगोकार यांना पुढील वाटचालीस च्या हार्दिक शुभेच्छा देऊन पदभार स्वीकारावा असे जाहीर केले आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या