Home Breaking News महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी रवि लांडे (पाटील )यांनी आज एका...

महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी रवि लांडे (पाटील )यांनी आज एका निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी आणि पोलीस स्टेशन बाळापुर येथे एका निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली…

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि ज्येष्ठ समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचे विषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे विरुद्ध कायदेशीर कारवाई करावी.. 

बाळापुर (तालुका प्रतिनिधी) राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले ह्या महामानवाच्या विरुद्ध आक्षेपार्ह विधान करून समाजात अशांती निर्माण करणाऱ्या मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांचे विरुद्ध राष्ट्रवादी कारवाई करण्यात यावी आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी विनंती महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी रवि लांडे (पाटील) ह्यांचे नेतृत्वात आज बाळापूर येथे तहसीलदार मा .राहुल तायडे साहेब ह्यांचे कडे तक्रार दाखल करताना केलेली आहे. महामानवांचा वेळोवेळी अपमान करणारे वादग्रस्त विधान करनारे संभाजी भिडे यांनी राष्ट्रध्वज तसेच राष्ट्रगीताच्या बाबतीतही वादग्रस्त विधान केलेले आहे त्या विरोधात त्यांच्यावर..
मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांच्या विरुद्ध भारतीय दंड संविधान 295 अ,/ 153 अ,/124अ,नुसार गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी जेणेकरून समाजात तेढ निर्माण करून सामाजिक अशांतता आणि कायद्याची सविस्तर सुव्यवस्था बिघडणार नाही. अशी मागणी सुद्धा निवेदन देता वेळेस महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी रवि लांडे यांनी केलेली आहे… वरील निवेदनाचे श्रेय ते महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री नानाभाऊ पटोले आणि किसान काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष परागजी पाष्टे यांना देतात…. असे सविस्तर निवेदन देता वेळेस त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी बाळापुर तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेश नळकांडे, तालुका शहर प्रमुखअमजद हुसेन सर,अरुण देशमुख,रामदासजी वानखडे,अनिल धनोकार,प्रशांत लहाने,प्रफुल्ल धनोकार नितीन हुसे,भीमराव खंडारे,शंकर कान्हेरकर,सुपडा नाटकर ,गौतम वाकोडे, अरुण देशमुख,मोहन फुरंगे,अमीर खा पठाण अरुण मदनकार ह्यांचे सह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते…

Previous articleबुलढाण्यात वंचित महिला आघाडीकडुन मणिपूर प्रकरणी आंदोलन
Next articleवंचित युवा आघाडीचा जुने शहर पोलीस ठाण्यात ठिय्या.