जिल्हा प्रतिनिधी नांदेड
???? लोकनेते आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे प्रतिपादन.
हिमायतनगर तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सर्व अधिकार, कर्मचारी यांना मार्गदर्शन करताना , आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी आपल्या मनोगतात बोलतांना सांगितले, हदगाव- हिमायतनगर तालुक्यातील माझा बळीराजा अनुदानापासून वंचीत राहणार नाही. यांची सर्व खबरदारी हिमायतनगर तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी घ्यावी. व तसेच फेरफार, बाधीत क्षेत्रात शेतकऱ्यांचे नांवे टाकण्यासाठी तालुक्यातील काही तलाठी आपले उकळ पांढरे करत आहेत. यांची शहनिशा मा. तहसिलदार यांनी करुन, संबंधित तलाठ्यांवर कार्यवाही करण्यात यावी. असेही ते म्हणाले.
सर्वसामान्यांच्या टाळुवरचे लोणी खाऊ नका.
???? संरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष परमेश्वर गोपतवाड यांचा आमदार महोदयांसमोर अधिकारी व कर्मचारी यांची सुचना.
हिमायतनगर तालुक्यातील तहसील कार्यालयात आयोजित बैठकीत आपल्या प्रस्ताविक भाषनात, संरपंच संघटनेचे अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड यांनी, आमदार माधवराव पाटील जवळगावकर साहेब व तहसिलदार शेंडे साहेब यांच्या समक्ष अधिकारी व कर्मचारी यांनी सर्वसामान्य, शेतकरी, शेतमजुर यांच्या टाळुवरचे लोणी खाणे थांबवावे. अन्यथा आपलेच वाटणारे आमदार साहेब कुणाचीही गर करणार नाहीत. याच जबाबदारीने आपआपली कर्तव्य सर्वांनी पार पाडावी. असेही गोपतवाड यांनी महसूल, कृषि व पंचायत समिती या सर्व कर्मचारी व अधिकारी यांना आमदार महोदयांसमोक्ष सांगितले.