योगेश घायवट जिल्हा प्रतिनिधी अकोला
अकोला – वंचित बहुजन आघाडीच्यावतीने मणिपूर हिंसाचाराविरोधात अकोला जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे जिल्हा महासचिव मिलींद इंगळे महिला जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. तर या निवेदनात खालील प्रमाणे मागणी करण्यात आली आहे.
मणिपूर मधील ‘कुकी’ या आदिवासी जमातीच्या महिलेवर झालेल्या अत्याचाराचा वंचित बहुजन महिला आघाडी निषेध करीत आहे. मणिपूर येथे ‘मैतेई’ आणि ‘कुकी’ व ‘नागा’ व इतर आदिवासी जमातीमध्ये गेल्या दोन महिन्यापासून संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष आता दंगल, जाळपोट आणि नरसंहारापर्यंत पोहोचला आहे. हा संघर्ष मैतेई या उच्च जाती जी हिंदू आहे त्यांना कुकी, नागा प्रमाणे आदिवासींचा दर्जा हवा आहे, तर कुकी, नागा व इतर आदिवासी जमाती या मणिपूरच्या डोंगर माथ्यावर राहत आहे.
का अभ्यासकांच्या मते, मणिपूरच्या या पहाडांवर प्रचंड मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती दडली असून कुकी व इतर आदिवासी जमातीच्या वास्तव्यामुळे पहाड पोखरून खनिज संपत्ती ताब्यात घेणे कठीण जात आहे. तसेच मैतेई ना ST चा दर्जा नसल्याने ते आदिवासींच्या जमिनी विकत घेऊ शकत नाहीत. परिणामी या सर्व आदिवासी जमातींना तिथून हुसकावून लावण्यासाठी मणीपूर दंगल पेटवली असल्याचे बोलले जाते
दंगलीचा कळस म्हणजे मणिपूर राज्यातील इम्फाळ पासून 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावातील “कुकी” या आदिवासी जमातीच्या दोन महिलांना पोलिसांच्या संरक्षणातून बाहेर काढून मैतेई पुरुषांच्या हिंस जमावाने विवस्त्र करून त्यांच्या नग्न देहाची विटंबना करण्यात आली. या घडलेल्या घटनेचा मागोवा घेतला असता ही घटना 4 मे रोजी पडल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांच्या समक्ष ही घटना घडूनही पोलिसांनी त्यावर कोणतीही अॅक्शन घेतली नाही व FIR सुद्धा दाखल केले नसल्याचे सिद्ध झाले आहे. ही घटना 18 जुलै रोजी सोशल मीडियामुळे व्हायरल झाली तेव्हा FIR दाखल करण्यात आले आहे. कुकी आदिवासी समुदायातील दोन महिलांना विवस्त्र करून फिरवण्यात आले, त्यांच्या देहाची क्रूरपणे विटंबना करण्यात आली. तसेच आरोपींना पकडण्यात पोलिसाची टाळाटाळ यावरून ही घटना राज्य पुरस्कृत असून ही ब्राह्मणी भांडवली धर्मांध शक्तींच्या क्रूरतेचा कळस असल्याचे आम्ही मानत आहोत.
आज दोन महिन्यापासून मणिपूर राज्य जळत आहे. नरसंहार लेकी बाळींची अब्रू घेतल्या जात आहे. मैतई या जातींना पूर्ण संरक्षण देऊन दंगल सुरू ठेवण्याचे कार्य भाजप सरकार करीत आहेत. हेच या घटनेवरून निदर्शनास येत आहे. “बेटी बचाव, बेटी पढाव ” चा ढोल वाजविणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश वाऱ्या करण्यात मशगुल होते. मणिपूरमध्ये वेळीच लक्ष घातले असते, तर देशाला लज्जास्पद आणि लांच्छनास्पद घटना घडली नसती. कुफी महिलांवर झालेल्या अमानवीय अत्याचाराने आम्ही अत्यंत संतप्त झालो आहोत.
भाजपाचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह, अमित शहा यांचा राजीनामा ताबोडतोब घेत आरोपींना शिक्षा द्यावी. तसेच आमच्या मते ही दंगल सरकार पुरस्कृत आहे. मणिपूर मधील कुकी या आदिवासी जमातीच्या महिलांवर झालेला अत्याचार हा अतिशय निंदनीय आहे. असे असुन मणिपूर मधे घडलेल्या घटनेचा व मणिपूर राज्य सरकार व केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यातील आदिवासी महिला व पुरुषांच्या वतीने मणिपूर मधे घडलेल्या घटनेचा व मणिपूर राज्य सरकार व केंद्र सरकारच्या निषेधार्थ निषेध मार्च काढून अकोला जिल्हाधिकारी मार्फत निवेदन केंद्र सरकारला देण्यात आले.
या निषेध मोर्चात वंचित बहुजन आघाडीच्या महिला प्रदेश महासचिव अरूंधतीताई शिरसाट, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलींद इंगळे, महिला जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट, युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, जि. प. अध्यक्ष संगीताताई आढावू, जि. प. उपाध्यक्ष सुनील फाटकर, ओबीसी नेते ॲड संतोष राहाटे, माजी मनपा गटनेते गजानन गवई, जिल्हा परिषद गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, जिल्हा महासचिव शोभाताई शेळके, निलोफर शहा, जिल्हा उपाध्यक्ष कविता राठोड, माजी महासचिव दिपक गवई, युवा महासचिव राजकुमार दामोदर, जिल्हा युवा संघटक समीर पठाण, दिनकरराव खंडारे, अत्यल्प समाज संघटनेचे अध्यक्ष गोपाल राऊत, उद्योजक कश्यप जगताप, दिपक बोडखे, कलीम खान पठाण, गोपाल ढोरे, सोशल मिडिया प्रमुख ॲड प्रशिक मोरे,नितेश कीर्तक, आशिष मांगुळकर जय तायडे, संदिप गवई, विकास पवार, अमोल शिरसाट. योगेश कीर्तक. आदिवासी नेते संजय कासदे, सुरेंद्र सोळंके, संजय लोखंडे, समाजकल्याण सभापती आम्रपालीताई खंडारे, शिक्षण सभापती मायाताई नाईक, महिला व बालकल्याण सभापती रिजवाना परवीन, कृषी सभापती योगीताताई रोकडे, सौ. प्रतिभा अवचार, अकोट तालुकाध्यक्ष चरण इंगळे, पातुर तालुकाध्यक्ष डॉ ओमप्रकाश धर्माळ, तेल्हारा तालुकाध्यक्ष अशोक दारोकार, अकोला तालुकाध्यक्ष किशोर जामणिक, अकोला तालुका कार्याध्यक्ष पवन बुटे, मुर्तीजापुर तालुकाध्यक्ष सुनिल सरदार, जिल्हा परिषद सदस्य पुष्पाताई इंगळे, निताताई गवई, प्रमोदिनीताई कोल्हे, लिनाताई शेगोकार, प्रगतीताई दांदळे, मीनाताई बावणे, सुष्मिताताई सरकटे, मिराताई पाचपोर, प्रतिभाताई भोजने, स्फुर्तीताई गावंडे, सावित्रीबाई राठोड, मिनाश्रीताई उन्हाळे, रामकुमार गव्हाणकर, आकाश शिरसाट, विनोद देशमुख, सुशांत बोर्डे, अनंतराव अवचार, उपसभापती अजय शेगोकार, तालुका महासचिव शरद इंगोले, सह जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विकास सदांशिव, महानगर महासचिव प्रा. मंतोषताई मोहोळ, सुरेंद्र तेलगोटे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन शिराळे, डॉ. शंकरराव राजुस्कर, वसंतराव नागे, मोहन तायडे, शिलवंत शिरसाट, सुरेंद्र ओईंबे, स्वप्निल सरकटे, दिनेश गवई, रुग्णसेवक नितीन सपकाळ, अशोका सेनेचे अध्यक्ष आकाश शिरसाट मंदा कोल्हे,सुरेखा सावदेकर,छाया तायडे, वैशाली कांबळे, अनघा ठाकरे, सुनिता भगत, उज्वला गडलींग,मंगला शिरसाट,रेखा गोपनारायण, विजया गोपनारायण, सुनिता हिरोळे,लता कांबळे, विद्या शामस्कार, स्वाती भोजने, अनिता हिवराळे, सुनिता धुरंधर, नितीन वानखडे निलेश इंगळे सुबोध डोंगरे नागेश डोंगरे श्रीकृष्ण देवकुंडी शुभम डहाके मीनल मेंढे अमोल जामनेर दादाराव पवार समीर पठाण अक्षय राठोड संदीप गवळी मनोज तायडे आकाश शिरसाट शेखर इंगळे, सत्यप्रकाश आर्या. कुणाल शिरसाट. भूषण खंडारे. रवी खांडेकर. अमोल इंगळे. विशाल वाघ. पंकज दामोदर. अजित भाई. आदर्श शिरसाट. दिलीप शिरसाट, किशोर वानखडे, आकाश शिरसाट, सावदेकर गुरूजी, देवानंद अंभोरे, महेंद्र डोंगरे, बुध्दरत्न इंगोले, मनोहर बनसोड, संजय सोनोने, चंद्रकांत पाटील, उपसभापती इम्रान खान, अर्जुन टप्पे, अनिल राठोड, श्याम ठाकरे, रितेश फुलारी, शरद सुरवाडे, शुध्दोधन इंगळे, रोहिदास राठोड, सुनिल तामखाने, मोहन रोकडे, शेख मुख्तार, संजय नाईक, गोपाल कोल्हे, रामसिंग दहिकर, पक्षीराज चक्रनारायण, जया चव्हाण, सरपंच भिलावेकर, प्रविण सुरतने, व डिगांबर कासदे यांच्यासह हजारो आदिवासी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच आदिवासी महिला व पुरूषांच्या जेवणाची व्यवस्था ओबीसी नेते गोपाल राऊत, ओबीसी नेते ॲड संतोष राहाटे, ओबीसी नेते गोपाल ढोरे यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली.