अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी हदगाव तालुक्यातील हडसणी येथील दत्ता पाटील हडसणीकर हे मागील 13 दिवसापासून अमरण उपोषण करत आहेत त्यामुळे त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत तरी पण त्यांचे उपोषण चालूच असल्यामुळे हिमायतनगर येथील सकल मराठा समाज बांधवांकडून आज दि 17 जुलै रोजी तहसीलदार यांना एक निवेदन देऊन मराठा समाज आरक्षणासाठी लढणाऱ्या दत्ता पाटील हडसणीकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे…
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या शासनाने तात्काळ मंजूर करून मागील दिनांक 3 जुलैपासून हडसणी तालुका हदगाव येथे आमरण उपोषणास बसलेल्या दत्ता पाटील हडसणीकर यांना न्याय मिळवून द्यावा त्यासाठी हिमायतनगर शहरातील सकल मराठा समाज बांधवांनी आज त्यांना जाहीर पाठिंबा देत या बाबीची तात्काळ वरिष्ठानी दखल घेऊन मराठा समाज बांधवांच्या आरक्षणाबाबत तात्काळ ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी हिमायतनगर येथील सकल मराठा समाज बांधवांनी केली आहे यावेळी सकल मराठा समाजाचे डॉ.कदम साहेब, डॉ.वानखेडे साहेब, विठ्ठल ठाकरे,विलास वानखेडे,संजय माने,रामभाऊ सूर्यवंशी,लक्ष्मण डांगे,राजू पाटील अवधूत पवार, वामनराव मिराशे,श्री दत्त पाटील सोनारीकर,संजय सुर्यवंशी,शुभम हरडपकर,अरविंद वानखेडे,अजय चव्हाण,संतोष माने,महेश शिरफुले,राहुल डांगे,प्रदीप ढोणे, सह असंख्य मराठा समाज बांधव उपस्थित होते..