हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़ मो. नंबर – 8983319070
नाशिक जिल्यातील चांदवड तालुक्यातील उसवाडच्या धनगर समाजाच्या सुरेखा बिडगर हया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2020 च्या पोलिस उपनिरीक्षक परिक्षेत उत्तीर्ण होवुन यशाला गवसणी घातली नाही तर राज्यात प्रथम येण्याचा मानही मिळविला आहे.
सुरेखा बिडगर यांचे शिक्षण उसवाड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. उच्च माध्यमिक शिक्षण चांदवडच्या नेमिनाथ शिक्षण संस्थेत तर एफ. वाय. मध्ये असताना 2006 मध्ये प्रशांत शेळके या अभियंत्या सोबत लग्न झाले. एस. वाय नंतर त्यांचे सर्व शिक्षण पती ने पुर्ण केले. त्यानंतर 2013 मध्ये बी. एड. पुर्ण करुन सन 2015 मध्ये शिक्षक म्हणून व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थे त नौकरीला प्रांरभ केला. मात्र, त्यांना वर्दीचे आकर्षण स्वस्थ बसू देत नसल्याने राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचे ठरवले, पती सोबत चर्चा केल्या नंतर पती ने सकारात्मक प्रतिसाद देत अभ्यास कसा करावा याचे मार्गदर्शन केले.
सन 2020 मध्ये परीक्षा दिली, या परिक्षेचा निकाल जाहीर झाला. पास होणार याची खात्री होती, मात्र मुलीं मध्ये राज्यात प्रथम येणार अशी कधीच कल्पना केली नव्हती, असे त्या म्हणाल्या. मात्र निकाल जाहीर झाल्या वर आनंदाला पारावर उरला नाही. याचे श्रेय सुरेखा या आपल्या कुटुंबियांना देतात.
अधिकारी होत नाही तोपर्यंत मोबाइल वापरणार नाही असे त्यांनी ठरवले होते, त्यामुळे निकाल जाहीर झाल्या नंतरच त्यांनी एंड्राइड मोबाइलला हात लावला तो फ़क्त सोशल मिडियावर शुभेच्छा स्वीकारण्यासाठी व सोशल मीडिया पासून दूर राहिल्यानेच यशाला गवसणी घातल्याचे आवर्जुन सांगितले.