मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक 23 जुन 2023
नांदेड जिल्ह्यातील सध्याचे तीव्र तापमान लक्षात घेता, विद्यार्थ्यांना पुर्णवेळ शाळेत राहणे असाह्य होत आहे. म्हणून दिनांक-020 जुन ते 30 जुन प्रर्यंत, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागा अंतर्गत जिल्हा परिषद व खाजगी विभागाच्या सर्व माध्यमाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी उन्हाची तीव्रता लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठीची बाब विचारात घेऊन, दिनांक 20 जुन पासून सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी 8 ते 1 वाजेप्रर्यंत शनिवारी सकाळी 8 ते 11 वाजेप्रयंत आणि मध्यांतरासाठी 15 मिनीटे देण्यात आली आहेत.वरील प्रमाणे पत्र पाठवून जिल्हा परिषद नांदेड शिक्षणाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व पंचायत समितींना पत्र पाठवले आहे. पाऊस पडत नसल्याने सुर्य आग ओकतो आहे. पाऊस लांबल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.