Home Breaking News शेगाव येथे योगा दिवस संपन्न

शेगाव येथे योगा दिवस संपन्न

शितल शेगोकार प्रतिनिधी भूमीराजा

आज दिनांक 21 जून जागतिक योगा दिवस या दिवसानिमित्त अंगणवाडीतील नगरमध्ये अंगणवाडी केंद्र क्रमांक 123 भीम नगर येथील पालकांना किशोरवयी मुलींना 18 ते 45 वर्षातील महिला व इतर पालक वर्ग उपस्थित राहून योगा दिवस साजरा केला अंगणवाडी सेविका शितल शेगोकार यांनी योगा दिवसा विषयी माहिती दिली तसेच आपल्याला अन्न वस्त्र निवाऱ्याची गरज आहे पण आपल्या शरीराला त्याचबरोबर व्यायामाचे योगा ची खूप गरज आहे जसे ऑक्सिजन मुळे आपण जगू शकतो तसेच नियमित योगा केल्याने आपण अधिक काळ जगू शकतो कार्यक्रमांमध्ये एरियातील पालक वर्गांनी भरगच्च असा प्रतिसाद दिला अंगणवाडी मदतनीस रेखा शेगोकार मुलांना अर्ध चक्रासन त्रिकोणासन भद्रासन वज्रासन अर्धा उष्टासन शशाकासन मंडूकासन वक्रासन भुजंगासन शलभासन शवासन कपालभारती प्राणायाम भ्रामरी प्राणायाम शांभवी मुद्रासने इत्यादी शिकविण्यात आले आणि वेळात वेळ काढून घरी रोज करावे असे सांगितले

Previous articleपावसाची वाट पाहत…शेतकरी पाहतोय निरभ्र आकाशाकडे
Next articleतळपत्या उन्हामुळे शाळेच्या वेळेत तात्पुरता बदल!