हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़ मो. नंबर – 8983319070
नाशिक महापालिकेचे आयुक्त व प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या बदली नंतर ज्याच्या कडे प्रभारी आयुक्त पदभार दिलेला होता ते विभागीय मह सूल आयुक्त राधाकृष्ण गमे देखील रजेवर गेल्याने आता महापालिकेचा आयुक्त पदाचा प्रभारी कारभार शासनाने जिल्हाधिकारी डी. गंगाथरन यांच्या कडे दिला आहे.
गमे हे 8 जून पासून रजे वर जात असल्याने आयुक्त पदाचा प्रभारी कारभार जिल्हाधिकारी डी. गंगाथरन यांच्या कडे सोपवण्या येत आहे. गेल्याच आठवडयात नाशिक महानगर पालिके च्या शिक्षणाधिकारी सुनिता धनगर यांना अँन्टी करप्शन ब्युरो ने 50,000 हजार रूपयाची लाच घेताना अटक केलेली आहे. त्यामुळे आधीच महापालिकेत खळबळ उडाली आहे. त्यातच नाशिक महापालिका आयुक्त पदावर नवीन आयुक्ता च्या नियुक्ती चे आदेश शासना कडून जारी होण्याची शक्यता आहे.
नंदूरबारच्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री, फिल्मसिटीचे संचालक डॉ. अविनाश ढाकणे तसेच नंदुरबार जिल्हा परिषदेचे सीईओ रघुनाथ गावड़े, राज्या चे इएसआय आयुक्त अशोक करंजकर, सोलापुरचे सीईओ दिलीप स्वामी यांच्यात रस्सी खेच सुरु आहे.