मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 06 जुन 2023
भोकर ते हिमायतनगर महामार्गावरील राजवाडी फाटयापासुन पिंपळगाव तांडा ते पिंपळगाव – राजवाडी या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. हा भाग माळरानपटयात येत असुन, याच रस्त्यावर सर्वांचे आराध्य दैवत असलेल्या श्री बालयोगी महाराज यांच्या पुढाकाराने निर्माण झालेले, भव्यदिव्य असे दत्त मंदिर आहे. मंदिर पाहण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी अनेक भक्तमंडळी पोर्णिमेला आवर्जून येथे येतात. या मंदिराचा परीसर नयनरम्य आहे. मंदिर प्रचंड मोठे असुन भव्यदिव्य आहे. भाविक भक्तांना येताजातांना प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करुन, गावकरी बांधवासहित भाविकांना दिलासा द्यावा. अशी मागणी होत आहे.