योगेश घायवट जिल्हा प्रतिनिधी अकोला भूमीराजा
अकोला – वंचित बहुजन आघाडीचे राजेश महल्ले यांची पातुर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदी अविरोध निवड करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीने अकोला जिल्ह्यामध्ये संपूर्ण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पहिल्या वेळेस वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत बॅनरखाली निवडणूक लढवल्या. या निवडणुकीमध्ये जिल्हाभरातून 13 संचालक निवडून आले, तर दहा उमेदवार हे अवघ्या 15 मताच्या आत फरकाने पराभूत झाले. पातुर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे चार उमेदवार निवडून आले. पहिल्या वेळेस पातुर पंचायत समितीचे उपसभापती म्हणून अधिकृत वंचित बहुजन आघाडीचे राजेश महल्ले यांची अविरोध निवड झाल्याने जिल्ह्याभरात आनंदाचे वातावरण आहे.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, तालुका अध्यक्ष डॉक्टर धर्माळ यांच्या मार्गदर्शनात वंचित बहुजन आघाडीचे पातुर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती पदाची वंचित बहुजन आघाडीचे राजेश महल्ले यांची निवड करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण पातुर तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदार यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.