Home Breaking News भारतीय जनता पार्टी, जुने नाशिक मंडळ च्या वतीने गोदामाई प्रतिष्ठाणच्या स्वयंसेवकांचा 50...

भारतीय जनता पार्टी, जुने नाशिक मंडळ च्या वतीने गोदामाई प्रतिष्ठाणच्या स्वयंसेवकांचा 50 व्या सप्ताहा निमित्त सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक हेमंत शिंदे मो. नंबर – 8983319070

“गोदामाई प्रतिष्ठाण ” नाशिक च्या वतीने गेल्या एक वर्षा पासून दर रविवारी प्रतिष्ठा चे संस्थापक अध्यक्ष आदीनाथ ढाकणे व अभिनेते व प्रतिष्ठाणचे उपाध्यक्ष चिन्मय उदगीरकर यांच्या मार्ग दर्श नाखाली गोदा नदी स्वच्छता अभियान राबविले जाते. 30 एप्रिल रोजी या अभियानाचा 50 वा आठवडा पुर्ण झाला. भारतीय जनता पार्टी, जुणे नाशिक मंडळ च्या रतन काळे, दिपक पाटील, तानाज़ी एकनाथ या पदाधिकारी यांनी भारतीय जनता पार्टी पार्टी चे राज्य प्रवक्ते मा. लक्मण सावजी, भाजपाचे युवा नेते मा. अजिंक्य फरांदे या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सत्कार सोहळयाचे आयोजन रविवारी गोदाकाठी सकाळी 10 वाजता केले होते.
या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी गोदा स्वच्छता अभियानाची मुक्त कंठानी प्रशंसा केली व भारतीय जनता पार्टीच्या वतीने अभियानाला सर्वोपरी सहकार्याची हामी दिली. या प्रसंगी प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष आदीनाथ ढाकणे, नाशिकची कार्यकारी अध्यक्ष कु. सृष्टी देव आदी सह अन्य पाहुणे मंचावर उपस्थित होते.

प्रतिक्रिया :-

सृष्टी देव (नाशिक कार्यकारी अध्यक्ष – गोदामाई प्रतिष्ठाण )

गेल्या तब्बल 50 आठवड्या पासून “गोदामाई प्रतिष्ठाण ” नाशिकच्या वतीने अविरत गोदामाई स्वछता अभियान राबविले जात आहे.पवित्र ब्रम्हगिरी वर उगमस्थान असलेल्या गोदावरीचे नाशिक शहरातील कंपन्याचे प्रदुषीत पाणी गोदावरीत सोडणे, शहरातील दुर्गधीयुक्त पाणी ड्रेनेज़ द्वारे नदीत सोडणे, धार्मिक कर्मकांडामुळे मोठ्या प्रमाणामुळे निर्माण होणार्या निर्माल्याची गोदावरीत विल्हेवाट लावणे या सह अन्य कारणाने नाशिक मधील पवित्र गोदावरीचे गटार गंगेत रूपांतर झाले आहे.
गोदावरीला तीचे पवित्र पुर्नवैभव प्राप्त करुन द्यायचे असेल तर मोठ्या प्रमाणात नदी स्वच्छता अभियान राबविले पाहिजे. स्वयंसेवकांच्या मोठ्या प्रमाणातील सहभागामुळे या अभियानाला गती मिळत आहे, ही मोठ्या समाधानाची बाब आहे. व या पुढेही हे अभियान सातत्याने चालू राहील असे आश्वासन देते.

या सत्कारा प्रसंगी मा ज़ी प्रशासकीय अधिकारी शेखर ढेपे, भूमीराजा न्यूज़ चे नाशिक जिल्हा संपादक हेमंत शिंदे, गोदाकाठ पत्र वारीकार दत्तात्रय कोठावदे, यांनी या सत्कार प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमा प्रसंगी
आदिनाथ ढाकणे, सृष्टी देव, आबासाहेब देव, गैारी देव, हेमंत शिंदे, दत्तात्रय कोठावदे, शेखर ढेपे, अतिश दाणी, मयूर गायकवाड, निलेश राउत, भूषण शिनकर, जयश्री सिनकर, नीलम पानपाटील, विजय काकड़, प्रफुल्ल काळे, आनंद काळे, अमान उपगणलावार, सागर ढेपे, नरेंद्र पणशीकर, दिव्यांशू सिनकर, स्नेहानेरकर, अश्विनी गायकवाड,, सायली कोडीलकर, स्वप्निल चित्ते, दिलीप कोठावदे, अनिता पाटील, श्रीमंत बागल,, दीपश्री मेने, बंटी दादा, सचिन अमृतकर, नेरकर काका, प्रभाकर कोलकर, शैलेजा कोतकर, कोतकर ताई, कैचे, व्यवहारे, प्रसाद लाड़, योगेश शेजवळ, सरिता परदेशी, कोडीलकर ताई, गायकवाड काका या गोदामाई प्रतिष्ठाणच्या स्वयंसेवकांचा सत्कार करण्यात आला.

Previous articleसततच्या पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त!
Next articleसाहित्यधारा ब. उ. सेवाभावी संस्था, औरंगाबाद चे वतीने