Home Breaking News महिंद्राचा नवीन प्रकल्प नाशिक मध्येच होणार

महिंद्राचा नवीन प्रकल्प नाशिक मध्येच होणार

उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़
मो. नंबर – 8983319070

महिंद्राचा नवीन प्रकल्प विस्तार नाशिक मध्येच होईल. कुठेही अन्यथा प्रकल्प जाणार नाही.6.50 हजार कोटीची गुंतवणूक याद्वारे नाशिकला मिळणार आहे. तसेच नवीन उद्योगानाही मैत्री योजनेतर्गत 30 दिवसात परवानगी देण्यात येणार आहे. यातून उद्देश एकच की यातून रोजगार वाढावा, असे सामंत यांनी यावेळी सांगितले.
तसेच नाशिकला दिंडोरी – आक्रारे परिसरात रिलायन्स ला जागा दिली आहे.2100 कोटीची गुंतवणूक येणार आहे. तेथेच पिरामल प्रकल्पाचीही उभारणी होणार आसून 1200 कोटीची गुंतवणुक येईल. म्हणजे तब्बल 3300 कोटीची गुंतवणुक नाशिक मध्ये होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Previous articleपत्रकारांना धमकी देणाऱ्यास होणार दंड ५०,०००/-, ३ वर्षांपर्यंत तुरुंगवासही होऊ शकतो.
Next articleअकोला : गारपिटीचे तांडव थांबेना, बार्शीटाकळी, पातूरला पुन्हा झोडपले