जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 24 एप्रिल 2023
मौजे सवना येथील ग्रामपंचायतचे मा. सदस्य लक्ष्मणराव गायकवाड यांचे काल अल्पशा आजाराने निधन झाले. या निधनांची बातमी कळताच, कृषि उत्पन्न बाजार समिती हिमायतनगर येथील प्रचाराची रणधुमाळी सुरू असतांना आपली सर्व कामे बाजूला ठेवून हदगांव- हिमायतनगर तालुक्याचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर साहेब यांनी आज दुपारी गायकवाड परीवारांचे सांत्वन केले आहे. यावेळी सुरेश गायकवाड, शिवराज गायकवाड, आनंता बोलसटवार, दिगांबर अनगुलवार आदी उपस्थित होते.