योगेश घायवट
अकोला दि. २४ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती अंतर्गत बार्टी १ फेब्रुवारी २०२३ नुसार सचिव सामाजिक न्याय विभागास दिलेल्या निवडसूची नुसार ८६१ विद्यार्थी पात्र करण्यात आले आहेत बार्टीने निवडलेल्या ८६१ पात्र संशोधक विद्यार्थ्याना फेलोशिप अवॉर्ड करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून वंचित बहूजन युवा आघाडीने सर्व संशोधक विद्यार्थी विद्यार्थीनी ह्यांचे अभिनंदन केले असून त्यांनी परिश्रम घेऊन आपल्या संशोधनातून सामाजिक न्याय समता आणि लोकशाही बळकट करण्यासाठी त्याचा उपयोग करावा असा आशावाद युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी व्यक्त केला आहे.
सरसकट फेलोशिप अवॉर्ड ८६१ विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी संशोधक विद्यार्थी आझाद मैदानावर आंदोलन करीत असतांना त्यांना राजकीय आणि सामाजिक पातळीवर पूर्ण पाठिंबा देण्यात आला होता.त्यामुळे बार्टी ने अनुक्रमे २६ डिसेंबर २०२२ रोजी महासंचालक धम्मज्योती गजभिये आणि योजना विभाग प्रमुख स्नेहल भोसले ह्यांनी १ फेब्रुवारी २०२३ रोजी सरसकट ८६१ विद्यार्थी पात्र असल्याचे शासनाला दिलेल्या पत्रानुसार जाहीर केले होते.कार्यक्रम अधिकारी भोसले ह्यांनी ३२ व्या बैठकीमध्ये विषय क्र. ७ च्य मान्यतेनुसार एकूण २०० विद्यार्थ्यांना सदर अधिछात्रवृत्तीचा लाभ देण्यास मान्यता मिळाली होती ती केवळ २०० विद्यार्थ्यांची सूची ग्राह्य न धरता ८६१ विद्यार्थी बार्टी द्वारे पात्र करण्यात आले
एकूण सर्व ८६१ पात्र विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्याबाबत आदेश लवकरात लवकर निर्गमित करावे, अशी मागणी सचिव सामाजिक न्याय विभाग ह्यांचे कडे केली होती.मात्र तरीही सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे जाणीवपूर्वक खोडा घालत होते.मुख्यमंत्री पातळीवर हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नरत बाळासाहेब आंबेडकर ह्यांनी पुढाकार घेतला होता.अश्यातच स्नेहल भोसले, विभागप्रमुख योजना विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, बार्टी पुणे ह्यांनी १० एप्रिल रोजी घोषणापत्र जाहीर आणि केवळ २०० विद्यार्थी पात्र असल्याचे जाहीर करून निवड प्रक्रिया सुरू केळीव होती.त्याला आंदोलक विद्यार्थी व वंचित ने विरोध केला होता. हा विद्यार्थ्यांचे विश्वासघात पत्रक असून नवनियुक्त बार्टी महासंचालक सुनील वारे ह्यांचे मान्यतेने हे विश्वासघात पत्रक काढुन (बार्टी) पुणे मार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (BANRF) २०२१ करीता ३२ व्या मा. नियामक मंडळाच्या विषय क्र.८ मान्य निर्णयानुसार एकूण २०० विद्यार्थ्यांची निवड यादी व त्याअनुषंगाने विद्या शाखानिहाय प्रतिक्षा यादी या घोषणा पत्राद्वारे बार्टीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत असल्याने युवा आघाडी च्या पुणे कार्यकारणी ने बार्टी मध्ये धाव घेतली. २०० विद्यार्थ्यांना अवार्ड लेटर देण्यात येणार असल्याची बनवाबनवी युवा आघाडी सहन करणार नसून बार्टी महासंचालक वारे आणि योजना विभाग प्रमुख भोसले ह्यांना धारेवर धरण्यात आले.बार्टी च्या २६ डिसेंबर आणि १ फेब्रुवारी च्या पत्रातील निवडसूची नुसार पात्र ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप अवॉर्ड करण्याच्या दृष्टीने केवळ २०० विद्यार्थ्यांना दिले जाणारा अवॉर्ड प्रक्रिया रद्द करण्यात यावी, अन्यथा दोन्ही अधिकारी आणि सचिव सामाजिक न्याय विभागाचे सचिव ह्यांचे विरुद्ध पोलीसा कडे ४२० ची तक्रार करीत उच्च न्यायालयात याचिका करून सर्व निवड झालेल्या ८६१ पात्र विध्यार्थ्यांना लाभाचा लढा न्यायालयात लढू असा इशारा दिला होता.त्यामुळे बार्टी ने तात्काळ हे घोषणापत्र रद्द केले.त्यानंतर बाळासाहेब आंबेडकर आणि सुजात आंबेडकर ह्यांनी आझाद मैदानावर जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली.बार्टी मागील जनप्रतिनिधी ‘हाताखालून काढा’ असा आदेशवजा सल्ला बाळासाहेब आंबेडकर ह्यांनी देताच मुख्यमंत्री ताळ्यावर आले आणि सरसकट ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर करण्यात आली.सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना युवा आघाडीने त्याचे कडून भविष्यात सामाजिक न्याय आणि लोकशाही बळकटीकरण करण्यासाठी आपले संशोधन आणि बुद्धिमत्ता ह्याचा उपयोग करण्याचे आवाहन केले आहे.