राजकीय, धार्मिक, सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असणारे, सवना ग्रामपंचायतचे मा. सदस्य, शिवराज सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव गांधी गायकवाड (47) यांचे काल नांदेड रूग्णालयात उपचार चालू असताना सायंकाळी 5:30 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने गायकवाड परीवारासहित सवना गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, भावजई, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
अंत्यविधी आज दिनांक – 24 एप्रिल 2023 रोजी सवना गावी सकाळी 10:00 वाजता होणार आहे.