Home Breaking News लोकशाही मूल्यांचे अग्रदूत महात्मा संत बसवेश्वर..!

लोकशाही मूल्यांचे अग्रदूत महात्मा संत बसवेश्वर..!

जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 22 एप्रिल 2023

समता, मूल्य,न्याय,स्वातंत्र्य, बंधुता, व सर्व समावेशक समानता या सूत्रांची गुंफण करून खऱ्या अर्थाने बाराव्या शतकामध्ये भारतीय लोकशाहीचा पाया अनुभव मंडपाच्याद्वारे संत बसवेश्वर यांनी रचला.

सर्वांना धर्मामध्ये समान वागणूक सन्मान व पुजा
आणि विधी करण्याचा अधिकार मिळावा यासाठी बसवेश्वरांनी तत्कालीन काळातील जाती पातीची बंधने झुगारून सर्वसामान्य उपेक्षित वंचित घटकातील माणसाला अध्यात्माची द्वार खुले करून दिली,
तत्कालीन काळातील वाईट रूढी परंपरा असमानता, अस्पृश्यता, नष्ट करण्यासाठी संत बसवेश्वरांनी कृती रूप व्यवहाराच्या माध्यमातून समाजामध्ये समता प्रस्थापित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम केले,

संत बसवेश्वर यांनी आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन दिले व अनेक आंतरजातीय विवाह घडवून आणले. संत बसवेश्वर यांच्या जीवनाचा अभ्यास करताना आपणास काही ठळक गोष्टी लक्षात येतात. त्या म्हणजे समानता, नीती, स्वातंत्र्य, समता, बंधुता, आणि सर्वांना सन्मानाची व त्यासोबतच समानतेची वागणूक आणि हक्क व अधिकार देण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्च केले,

यासाठी संत बसवेश्वर यांचे साहित्य आणि जीवन आपणा सर्वांसमोर आदर्श कृती रूप ठेवाच आहे..

Previous articleवाढती महागाई, मोहमद पैगंबर बिलसाठी वंचित बहुजन आघाडीचा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांचा धडक मोर्चा
Next articleजिल्हा सामान्य रुग्णालयातील केस पेपरवरील जातीचा उल्लेख रद्द करा