अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी
बाळापूर:-आज दिनांक १४ एप्रिल २०२३ रोजी बाळापूर येथील डॉ. मनोरमा व प्रा. ह. शं. पुंडकर महाविद्यालयात IQAC अंतर्गत समान संधी केंद्र व ग्रंथालय विभागातर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.धैर्यवर्धन पुंडकर हे होते. यावेळी व्यासपीठावर
IQAC समन्वयक डॉ. सुनील उन्हाळे, वाणिज्य विभागाचे प्रा. शरद कुलट व कला शाखेचे डॉ.प्रकाश वानखडे हा उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा. एस. वाय. देशमुख यांनी केले. यावेळी त्यांनी समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या निर्देशानुसार राबविण्यात येणाऱ्या समता पर्व अभियानाबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमाचा भाग असलेल्या सामाजिक न्याय पर्व अभियानांतर्गत साजऱ्या होणाऱ्या महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने महाविद्यालयातील प्राध्यापक. एस. एन. वानखडे, प्रा. डॉ.आर.के.ढोरे, डॉ.प्रकाश वानखडे, डॉ. छाया बडनखे, शिलभद्र शेळके, डॉ.सुनील उन्हाळे या वक्त्यांनी डॉ. बाबासाहेब साहेब यांच्या कर्तृत्वाचा वेध घेतला. आपल्या अध्यक्षीय भाषणात मा. प्राचार्य डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकत ,बाबासाहेबांच्या बहुआयामी व वैश्विक व्यक्तिमत्वाच , त्यांच्या सामाजिक सुधारणा व क्रांतिकारी विचारांचा परामर्श घेतला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. ए. बी. भावसार यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.