शेख चाँद जिल्हा प्रतिनिधी
विद्युत प्रवाह तारा तोडल्या सुदैवाने कोणतेही जिवीत हाणी झाली नाही.
काल रात्री 11.30 च्या सुमारास बस स्थानक परिसरात सिनेस्टाईल एका कुटूंबाने दुसऱ्या कुटूंबावर तूफान दगड फेक करून रोडवर उभी असलेल्या चार चाकी गाडीच्या काचा फोडून खूप नुकसान केले . त्याच प्रमाणे खांब्यावरील एक विद्यूत प्रवाह सुरू असतांना त्यामधील एक जिवंत विद्य्युत तार तोडली असून त्यामध्ये सुदैवाने कोनत्याही प्रकारची जिवीत हानी झाली नाही . सविस्तर असे की वाडेगांव येथील राजकुमार रामरोहीया .व्यवसाय केबल चा व टी. व्ही. दुरूस्ती यांच्या वर व यांच्या कुटूंबावर बाजूला राहणारे दिवीत रमेश शर्मा. रमेश जगन्नाथ शर्मा. राजबाला रमेश शर्मा यांनी तुफान दगड फेक करून पाईपने मारहाण केल्या संदर्भात बाळापूर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केला असून. पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहे.
सदर प्रकरणात दोन्ही कुटुंबांनी एकमेकाविरूध्द पोलीसात तक्रार केल्याचे कळते