नियुक्त झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याचा समारंभ काल संपन्न झाला
उमेश मोरखडे शहर प्रतिनिधी…
खामगाव:-कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी या मेगाभरतीचे आयोजक अतुल सिरसाट युवा काँग्रेस नेते बुलढाणा जिल्हा हे होते,तर प्रमुख उपस्थितीमध्ये उद्योजक गौतम गवई,आंबेडकरी विचारवंत अंबादासजी वानखडे,डॉक्टर फराद शेख सर,संभाजीराव ताले,इंग्लिश ट्रेनर भारत साळवे सर,भरती अधिकारी रामा पवार, शिरसाट सर, होते.
१४/०३/२०२३ पासून ते १६/०३/२०२३ पर्यंत सुरू असलेल्या या भरतीला सुशिक्षित बेरोजगारांचा चांगलाच प्रतिसाद पाहायला मिळाला.
या भरती मधून ८६ सुरक्षा गार्ड व सुपरवायझर यांची नियुक्ती करण्यात आली व हे नियुक्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते सर्वांना सुपूर्द करण्यात आले.
मान्यवरांनी नियुक्त झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अतुल सिरसाट यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये जो संघर्ष करेल त्यालाच भविष्य आहे अशा प्रकारचे उद्गार काढले,कोणतेच काम छोटे किंवा मोठे नसते, कुठेतरी कामाची सुरुवात करावी लागते व त्यामधूनच व्यक्तिमत्व घडत असतं अशा प्रकारचं मार्गदर्शन अतुल सिरसाठ यांनी आपल्या भाषणातून केले. भविष्यामध्ये अशाच प्रकारचा आणखी यापेक्षाही मोठा बेरोजगारांसाठी उद्योजक मेळावा घेण्याचा संकल्प त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला.
नियुक्त झालेल्या सर्व उमेदवारांनी आयोजक अतुल सिरसाट यांचे मनापासून आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्लिश ट्रेनर भारत साळवे सर तर आभार प्रदर्शन भरती अधिकारी रामा पवार यांनी केले.