हिमायतनगर (नांदेड)- कृष्णा राठोड
शहरातील नगर पंचायत कार्यलायाच्या निष्काळजी पणा मुळे सामान्य नागरिकांचे जीव धोक्यात आले असून नगर पंचायत प्रशासन हिमायतनगर ला रस्ते, नाली सफाई व् दुरुस्तीसाठी मागण्या करून सुद्धा नगर पंचायत चे साफ साफ दुर्लक्ष होत असताना आढळून येत आहे.
हिमायतनगर शहरातील ठिकठिकाणच्या नाल्या जाम होऊन तुंबल्या आहेत. हिमायतनगर शहरातील काही महिन्या पूर्वीच बांधलेल्या नाल्या तूटून पडल्या आहेत. अनेक नाल्यावरचे स्लॅब रस्त्यावर तुटून पडल्याने नागरिकांना ये जा करताना त्याचा त्रास होत आहे.अनेक ठिकाणच्या नाल्यांची सफाई देखील करण्यात आली नाही.मुख्य चौक परिसरात नाली वरचे स्लॅब तोडण्यात आले होते परंतु नाली सफाई न करता नाली मोकळी सोडल्याने बाजार चौक परिसरात पोलिसांची वाहने देखील नालीत फसली होती.त्यानंतर हदगाव हिमायतनगर विधानसभेचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटिल यांचे वाहन सुद्धा बाजार चौक च्या नालीत फसले होते. परंतु राजकीय लोकांनी यावर जाणून बुजून दुर्लक्ष केले असल्याचे नागरिकांतून बोलल्या जात आहे.
नगर पंचायत हिमायतनगर च्या निष्काळजीपणामुळे सामान्य नागरिकांचे जिव
जीव धोक्यात आले असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. तसेच दि.३१ मार्च रोजी हिमायतनगर येथील मोमिनपुरा भागात राहणारे सामाजिक कार्यकर्ते अब्दुल हफीज भाई यांची आई सुद्धा स्लॅब तूटलेल्या नालीत पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आहे.तसेच नगर पंचायत ला वारंवार सुचना देवून सुद्धा हिमायतनगर पंचायत कार्यालयाने लक्ष न दिल्याने माझी आई नालीत पडली व त्यांना दुखापत झाली पण यापुढे इतर कुणाला याचा त्रास होऊ नये यासाठी या विषयाकडे गंभीरतेने बघण्याची गरज आहे.याकडे लोकप्रतिनिधींनी जातीने लक्ष द्यावे असे सामाजिक कार्यकर्ते अब्दुल हफीज भाई यांनी भुमीराजा न्युज च्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले आहे.याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन नागरिकांच्या जीवाशी खेळणे थांबवावे व नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी त्वरीत उपाययोजना कराव्यात अश्या भावना हिमायतनगर मधील नागरिकांमधून व्यक्त होत आहेेे.