👉 जागतिक महिला दिनानिमित्त
महाराष्ट्रात साडेतीन शक्ती पिठांची संकल्पना सुप्रतिष्ठीत आहे. याच संकल्पनेला देशपातळीवर अधोरेखित करणारा चित्ररथ प्रजासत्ताक दिनी सर्वांना महाराष्ट्र सरकारतर्फे दाखविण्यात आला. यातच आपल्या राज्य सरकारची प्राथमिकता दिसून येते.
देशाच्या सर्वोच्च पदावर राष्ट्रपती म्हणून आदिवासी कुटुंबातील महिला जेव्हा विराजमान होते, तेंव्हा भारत सरकारची प्राथमिकता जगाला विशिष्ट संदेश देणारी ठरते.
“वसुधैव कुटुंबकम” असे भारतीय तत्त्वज्ञान आचरणात आणताना या कुटुंबाचे सृजन करण्यासाठी शक्ती स्वरूप स्त्रीला सर्वोच्च सन्मान मिळणे हीच सर्वांची प्राथमिकता आहे. आणि असली पाहिजे.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महिलांची कामगिरी विशेष उल्लेखनीय आहे. राष्ट्रमाता जिजाऊ माॅसाहेब, राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, भारताची पहिली मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले, सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी, कल्पना चावला, माई सिंधुताई सपकाळ, मदर तेरेसा, किरण बेदी, अशा एक नाही अनेक महिलांचे नांव आताच्या पिढीला नविन प्रेरणादायी विचार, शौर्य, इतिहास, संस्कार, धाडस शिकविते.
भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना घरातील लक्ष्मीचे रुप म्हणुन आजही ते पुजनीय आहे. कारण आपल्या पिढीत एखादी मुलगी तरी जन्माला यावी. हिच प्रत्येक कुटुंबाची अपेक्षा असते. म्हणून म्हणतात…….ना….
” मुलगी हि दोन्ही कुळाचा उद्धार करणे”
माहेरचा आणि सासरचा ….
जागतिक स्तरावर महिलांचे महत्व अनन्यसाधारण आहे. कारण प्रत्येक क्षेत्रातील महिलांची कामगिरी हि दिवसेंदिवस विशेष उल्लेखनीय कामगिरी ठरत आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलांनी सर्वच क्षेत्रात आपल्या कामगिरीचा आलेख सदैव चढताच ठेवलेला आहे.
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
भुमी राजा न्युज लाईव्ह नांदेड