Home Breaking News शेतकऱ्यांसाठी होळीच्या सणाचे महत्त्व

शेतकऱ्यांसाठी होळीच्या सणाचे महत्त्व

जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 7 मार्च 2023

भारतीय शेतकरी हा निसर्गपुजक आहे. त्यामधे होळी या सनाला हंगामात आलेल्या पिकाबद्दल परमेश्वराला धन्यवाद देतो. प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रकारची होळीची पुजा करतात. महत्वाचे म्हणजे होळी चे दहन झाल्यावर जी राख शिल्लक राहते. ती राख शेतकरी आपल्या बि- बियाण्या मध्ये टाकतं असतो. त्या मागचे उद्दीष्ट आहे की, त्या बियाण्यास कीड लागत नाही. भारतीय शेती ही संस्कृती शी जुळली होती. मराठी फाल्गुन महीण्याच्या पौर्णिमेला ही अमंगल, द्वेषरूपी विचारांची होळी पेटवून शेतकरी आनंद उत्सव साजरा करतात. शेतक-यासाठी होळीचा सण हा महत्त्वाचा आहे. आता ही सण संस्कृती लृप्त होण्याच्या मार्गावर आहेत. कारण हा शेतकरी नापिकी, अस्मानी सुलतानी संकट, वातावरणात होणारा बदल अश्या या कचाट्यात सापडला आहे.
आताची परीस्थिती अशी झाली की ज्याच्या हातात पैसा त्यांचा सण आहे. ही संस्कृती या आधुनिक जीवनशैली व शहरीकरणाच्या ओघात नष्ट होत आहेत. त्याचं प्रमाणे पारंपरिक शेती ही तर काळाच्या ओघात नष्ट होत आहेत. पण ग्रामीण भागात ही संस्कृती जिवंत आहे शेतकरी बांधव ही परंपरा आजही जपताना दिसतात.आणखीन एक मजेशीर गोष्ट अशी की, ग्रामीण भागातले नागरीक स्वता:चे शरीर निरोगी राहावे, म्हणून होळीची राख अंगाला लावून स्नान करतात. ही प्रथा मी स्वतः लहानपणा पासून बघत आहे. होळीच्या म्हणजे शिमग्याच्या दुसऱ्या दिवशी रंग पंचमी सण साजरा केला जातो , या दिवशी लोक एकमेकांना गुलाल रंग लावून रंगांची उधळण करतात.
बद्दल परमेश्वराला धन्यवाद देतो.प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रकार मागचे उद्दीषपौर्णिमेला ही अमंगल, द्वेषरूपी विचारांची होळी पेटवून शेतकरी आनंद उत्सव साजरा करतात. आता ही सण संस्कृती लृप्त होण्याच्या मार्गावर आहेत.कारण हा शेतकरी नापिकी,अस्मानी सुलतानी संकट,वातावरणात होणारा बदल अश्या या कचाट्यात सापडला आहे…..
आताची परीस्थिती अशी झाली की ज्याच्या हातात पैसा त्यांचा निरोगी
तरुण वर्ग व शेतकरी वर्ग हा सण उत्सहाने साजरा करतात , सर्वानी एकत्र येणे , बंधुभाव आणि एकतेने आनंद साजरा करणे हाच या मागचा उद्धेश असतों.हा सण फाल्गुन महिन्यात येणार असल्याने सर्व शेतीची कामे संपलेली असतात.
शेतकरी याचा हा निवांत काळ असतो त्यामुळे हा सण साजरा होतो , होळी या सणाची भारताच्या बाहेर सुद्धा प्रसिद्धी आहे .आपन जेव्हा हरवलेल्या शेती संस्कृतीचा व सणा विचार करतो तेव्हा कधी लक्षात येते की, आपली पारंपरिक शेती आणि सेंद्रिय खतांचा व सुगंध ह्या गोष्टीचा ग्रामीण भागामधून केव्हा कमी झाला हे आपल्याला समजलेच नाही.आपन वर्तमानात हरवलेल्या नद्या, जलस्रोत, उजाड जंगले आणि शेती सभोवतालच्या नष्ट झालेल्या जैव विविधता शेतकर्‍यांशी जुळलेली कृषी संस्कृती…
आणि तिला जोडलेले सण, वार, उत्सव ह्यांचे मजबूत धागे आज आधुनिकतेच्या ओघात कमी झाले आहे. त्यामधला एक जरी धागा जुळला तर आपल्या बळीराजाच्या या सणाला आनंदाच्या रंगोत्सवची रंगत पुन्हा त्यांच्या जिवनात चांगली येऊ शकते….
आताही संस्कृती या आधुनिक जीवनशैली व शहरीकरणाच्या ओघात नष्ट होत आहेत त्याचं प्रमाणे पारंपरिक शेती ही तर काळाच्या ओघात नष्ट होत आहेत पण ग्रामीण भागात ही संस्कृती जिवंत आहे शेतकरी बांधव ही परंपरा आजही जपताना दिसतात.आणखीन एक मजेशीर गोष्ट अशी की, ग्रामिण भागातले नागरिक स्वताचे शरीर निरोगी राहावे…..
शेतकरी वर्गात होळीचे खास महत्त्व आहे..
या दिवशी हाती आलेल्या पिकाबद्दल देवाला धन्यवाद देण्यासाठी प्रार्थना करतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी गव्हांच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते. नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याचीही प्रथा आहे …..
आपली संस्कृती वाचली पाहिजे…

Previous articleपळस फुलला…..
Next articleचांदवड मधील होळकरशाहीचे भूषण असलेल्या ऐतिहासीक रंगमहाल मध्ये सुभेदार मल्हारराव होळकर जन्मोत्सव साजरा होणार