Home Breaking News पक्का पांदन रस्ता बनवा अन्यथा विधानसभा निवडणुकीत लोकप्रतिनिधींना गावबंधी करु!

पक्का पांदन रस्ता बनवा अन्यथा विधानसभा निवडणुकीत लोकप्रतिनिधींना गावबंधी करु!

👉 शेतकऱ्यांचा ईशारा

जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- १० जानेवारी २०२३

लोकसहभागातून स्वतः शेतकऱ्यांनी मातीकाम केले आहे. हिमायतनगर तालुक्यातील सर्वात मोठा पांदण रस्ता म्हणून सवना – रमनवाडी ते चिचोरडी म्हणून या रस्त्याची ओळख आहे. पक्का पादंण रस्त्ता बनविण्यासाठी केवळ पोकळ आश्वासने देऊन शेतकरी बांधवाची दिशाभूल करत आहेत. शेतकऱ्यांना विज, पक्का रस्ता, शेतीमालाला योग्य भाव दिला तर हा अन्नदाता सुखी होईल. अनेक वेळा मिडीयाचया माध्यमातून या पांदन रस्त्यासाठी निवेदन दिले आहे. मात्र प्रत्यक्षात वचनपूर्ती झालीच नाही.
याच पादंण रस्त्यावर हाकेला अंतरावर प्राथमिक आरोग्य केंद्र चिचोरडी आहे. रुग्णांच्या सोईसुविधा या पांदन रस्तामुळे आणखी सुखर होतील. वारंवार या पांदन रस्त्यासाठी आम्हाला झगडावे लागत आहे. आता आमचा संयम सुटला आहे. काही दिवसात काम सुरु करा अन्यथा येत्या विधानसभा निवडणुकीत लोकप्रतिनिधींना गावबंधी करु. अशा इशारा सवना ज., रमणवाडी, चिचोरडी येथील शेतकरी बांधवांनी दिला आहे.

Previous articleहिमायतनगर येथे भव्य, दिव्य स्वरुपात साजरी होणाऱ्या क्रांतिकारी जगदगरु सेवालाल महाराज जयंती सोहळ्यास हजारोच्या संख्येने सहभागी व्हा… नितीन राठोड कांडलीकर
Next articleश्रीमान युवराज यशवंत महाराज होळकर व होळकर शाहीची 16 वंशज यांचे चांदवड पुण्यनगरी स्वागत