खामगाव:-भारतीय संविधान भारतीय कायदे आणि माहिती अधिकार २००५ अन्वये दिलेल्या आचार संहितेचे पालन करत, शासकीय निमशासकीय आणि खाजगी कार्यालयातील शासन यंत्रणेतील व्यवहारात जास्तीत जास्त निकोप व पारदर्शकता यावी, भ्रष्टाचाराचे समूळ निर्मुलन व्हावे.प्रशासकिय कार्यपद्धती नियम व इतर शासकीय कामांमध्ये गैरव्यवहारास वाव राहू नये . शासकीय कार्यपद्धती बद्दल सामान्य जनतेला साशंकता वाटू नये व त्याची कामे विनाविलंब, सहजगत्या व्हावीत.माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या प्रचार संघटक खामगाव तालुका या पदावर अजयसिंह राजपूत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदर नियुक्ती ही दिनांक ०८/०२/२०२३ पासून पुढील तीन वर्ष किंवा पुढील आदेश येई पर्यंत लागू राहिल. सदर दिलेले पद हे मानद स्वरूपांचे असून आपणांस भारतीय संविधान, भारतीय कायदे, व आपल्या माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनची आचारसंहिता यांचे काटेकोर पालन करावयाचे आहे.आपण सदर पदावर राहून माहिती अधिकार अधिनियम २००५ चा व्यापक जनहितासाठी वापर करावा. तसेच सर्व सामान्य नागरिकांमध्ये व समाजामध्ये माहिती अधिकार अधिनियम २००५ चा प्रसार व प्रचार करावा अशी अपेक्षा आहे. आपण पदांचा जबाबदारीने वापर करावा.माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाची उद्दीष्टे,कार्य व प्रसार करण्यासाठी कसोटीने नवीन जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी खंबीरपणे प्रयत्नशील राहतील अशी आशा संस्थापक अध्यक्ष श्री सुभाष बसवेकर यांनी व्यक्त केली.
Home Breaking News माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या खामगाव तालुका प्रचार संघटक पदी अजयसिंह राजपूत यांची...