जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 05 जानेवारी 2023
गेल्या अनेक वर्षांपासून महादेव फाटा मोठ्या उत्साहाने यात्रा भरत असते. मागील दोन वर्ष वगळता यावर्षी प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.
पार्श्वनाथ मंदिर यात्रा महोत्सवात २२व्हॅॉलीबॉल संघाने आपला सहभाग नोंदविला होता. त्यापैकी प्रथम बक्षीस जलधारा संघाला मिळाला आहे.
हिमायतनगर तालुक्यातील…पाचशिव महादेव फाटा येथील पार्श्वनाथ मंदीर यात्रेमहोत्सवात 2 जानेवारी रोजी अभिषेक करुन महाप्रसादाने सुरुवात झाली आहे. कब्बडी स्पर्धा चार जानेवारी रोजी संपन्न झाल्या आहेत. 3 जानेवारी व्हॉलीबॉल स्पर्धेचा शुभारंभ ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भोगे यांच्या हस्ते करण्यात आला.या स्पर्धेत तेलंगणातील मुधोळ तालुका, नांदेड जिल्ह्यातील हदगाव, हिमायतनगर,किनवट आदी तालुक्यातील ग्रामीण भागातील जवळपास २२ संघाने सहभाग घेतला होता.गजानन बुरकुले,पवन आडे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा संपन्न झाल्या.शुभारभ प्रसंगी किनवटचे उपविभागीय कृषी अधिकारी रणवीर साहेब, कृषी सहायक गणेश बिल्लेवाड, प.स.चे गजानन पतंगे, ग्रामसेवक शिवाजी शिरारपलु, कासटवार, सरपंच बळवंत जाधव, पोलिस जमादार रंगराव राठोड पोलिस पाटील सौ.ज्योतीताई मिराशे, ऊपसरपंच रोशन धनवे, सरपंच सुनील शिरडे, सरपंच शंकरराव वागतकर,सरपच गुलाब राठोड, सरपंच सुरेश रौतुलवाड,एम पी डब्लु अशोकराव गायकवाड,डोखळे यांच्या सह परीसरातील भाविकांची उपस्थिती होती.या स्पर्धेचे पहिले बक्षीस माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाषदादा राठोड, दुसरेंदुसरें बक्षीस सुभाष आडे,तिसरे बक्षीस भगवान मेंडके यांनी ठेवले होते.पहिले बक्षीस जलधारा,दुसरे बक्षीस गणेशवाडी तांडा,,तिसरे बक्षीस सिरपल्ली ता मुधोळ यांनी पटकाविले. बक्षीस वितरण सोहळा सेवानिवृत्त मुख्याध्यापक माधवराव बिरकलवार, माजी सरपंच रामराव भिसे,दरेसरसमचे चेअरमन निळकंठ राठोड यांच्या हस्ते करण्यात आला.