Home Breaking News यावर्षी आंबा बहरला!

यावर्षी आंबा बहरला!

@ पिकपाणी वार्तापत्र @

जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 30 डिसेंबर 2022

फळांचा राजा म्हणून “आंबा” या फळपिकांला चांगलीच प्रसिद्धी असुन, कच्चा आंबा, पिकलेल्या आंब्याला चांगलीच मागणी असते. यावर्षी संबंध नांदेड जिल्ह्यात बहुतांश आंब्यांची झाडे फुलांनी बहरून गेली आहेत. आंबा या झाडाची पाने कमी आणि फुलही फुल दिसत आहे. मनमोहक दिसणारे हे फळांच्या राजाचे उत्पादन यावर्षी चांगले येणार आहे. अवकाळी पाऊस, चक्रीवादळ, वारा याने विश्रांती घेतल्यास यावर्षी आंबा या फळपिकांचे उत्पन्न चांगले मिळेल. असे जाणकार शेतकरी आवर्जून सांगत आहेत.
रब्बी हंगामातील हरभरा या पिकाची पेरणी हिमायतनगर तालुक्यात १५३४७ .०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सध्या पिकाची वाढ चांगली असुन, ढगाळ वातावरणामुळे फुलगळ होण्याची दाट शक्यता आहे.
रब्बी हंगामातील गहु या पिकाची पेरणी १६५९.०० हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. गहु पोटरा अवस्थेत आहे. वाढ जोमाने होत आहे.
रब्बी हंगामातील ज्वारी पिकांची पेरणी हिमायतनगर तालुक्यात १०२ हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. हळद पिकावर कर-या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
एकंदरीत हिमायतनगर तालुक्यातील रब्बी हंगामातील पिकांची परिस्थिती चांगली असुन, ढगाळ वातावरणामुळे पिकांचे तुला या पिकाचे फुलगळ होत आहे. तसेच शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

Previous articleएक लाख रुपयांची लाच स्वीकारतांना उपजिल्हाधिकारी घुगे यांना अटक..!
Next articleअलविदा…… 2022 !