अँकर शितल शेगोकार प्रतिनिधी शेगाव
अकोला ७ डिसेंबर – आंतराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था , भारत यांच्या वतीने देण्यांत येणारा ‘राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार -२०२२ ‘ अकोला येथील सुप्रसिध्द साहित्यिक डॉ. अशोक शिरसाट यांना नुकताच मान्यवरांच्या हस्ते पुणे येथील राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन हिवाळी अधिवेशन -२०२२च्या कार्यक्रमांत प्रदान करण्यांत आला. सदर संस्था ही भारत निती आयोग द्वारा प्रमाणित तसेच सामाजिक न्याय अधिकरीता मंत्रालय द्वारा प्रमाणित असून ,
आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या राष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आकर्षक स्मृतीचिन्ह , राष्ट्रीय पर्यावरण मित्र पुरस्कार -सन्मानपत्र देऊन डॉ . शिरसाट यांना गौरविण्यांत आले. याप्रसंगी या बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक आंतरराष्ट्रीय अध्यक्ष मा. देवा तांबे , युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका -आंतरराष्ट्रीय उपाध्यक्षा श्रीमती सुहासिनी म्हाळस्कर -भामरे , आंतरराष्ट्रीय सेक्रेटरी मा.सौरभ हजारे , मा. दिपक काळे, महापौर सौ. उषा ( माई ) ढोरे -पिंपरी चिंचवड मनपा पुणे , विशेष पोलीस महानिरिक्षक आयपीएस माजी अधिकारी मा.डॉ. विठ्ठलराव जाधव , चाळीसगांव फॉरेस्ट ऑफीसर – मा. शितल नगराळे , गोदान चळवळ भारत चे मा. मुबारक भाई शेख, जेष्ठ पत्रकार मुंबईचे मा. घाणेकर आदि मान्यवरांच्या हस्ते डॉ. अशोक शिरसाट यांना सन्मानित करण्यांत आले.