Home Breaking News *प्रत्येक अर्थशास्त्र अभ्यासकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावापुढे अर्थतज्ञ ही उपाधी लावावी...

*प्रत्येक अर्थशास्त्र अभ्यासकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावापुढे अर्थतज्ञ ही उपाधी लावावी ” – डॉ. संघर्ष सावळे*

अँकर शितल शेगोकार प्रतिनिधी भूमीराजा

दि. 20 नोव्हेंबर 2022 रोजी बहुजन साहित्य संघ चिखली – बुलढाणा यांच्या वतीने राज्य स्तरीय 5 वे बहुजन साहित्य संमेलन 2022 चे आयोजन मा. ऍड. विजयकुमार कस्तुरे यांनी केले. संमेलन अध्यक्ष मा. किरण डोंगरदिवे व उदघाटक मा. डॉ. ऋषिकेश कांबळे हे होते. तसेच संमेलनामध्ये होत असलेल्या कवि संमेलन व वैचारिक लेख हे सुद्धा प्रकाशित करण्यात आले. त्यामध्ये डॉ. संघर्ष सावळे यांनी “अर्थतज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व “हे शिर्षक घेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ सामाजिक व राजकीय क्षेत्रात प्राविण्य नसून ते अर्थशास्त्र विषयात ही पारंगत होते. तसेच त्यांना महामानव घटनेचे शिल्पकार व अर्थतज्ञ म्हणून संबोधावे असे आव्हान डॉ. संघर्ष सवाळे सरचिटणीस अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य यांनी केले. तसेच डॉ. संघर्ष सावळे हे मराठी विश्व कवी संमेलन दुबई येथे प्रमुख पाहुणे म्हणून सुद्धा उपस्थित राहिले होते.

Previous articleराहुलजी गांधी, सोबत प्रकाश तायडे सचिव महाराष्ट्र प्रदेश भारत जोडो सतत पदयात्रेत अभियानदरम्यान महत्वपुर्ण बाबीवर चर्चा करतांना,
Next articleशेतकऱ्यांनी निराश न होता. बुद्धीला चालना देऊन शेती करावी..