Home Breaking News राज्य नाट्य स्पर्धात नाशिक विभागात रंगणार 29 नाटके

राज्य नाट्य स्पर्धात नाशिक विभागात रंगणार 29 नाटके

सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आयोजन व श्री. सुधीर मुनगंटीवार,सांस्कृतिक कार्यमंत्री यांचे मार्गदर्शन

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर -8983319070

सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित 61 वी राज्य हौंशी मराठी नाट्य स्पर्धा 15 नोव्हेंबर पासून राज्यभरात सुरु होत आहे.नाशिक च्या प. सा. नाट्यगृहात रोज संध्याकाळी 7
वाजता नाशिक विभागाची प्राथमिक फेरी रंगणार आहे.या स्पर्धा मध्ये नाशिक सह तालुक्यांमधील अनेक संघानी सहभाग घेतला आहे.त्यामुळे स्पर्धा मध्ये चुरस खुप वाढली आहे.
नाशिक विभागीय फेरी 15 नोव्हेंबर पासून प्रारंभ होत आहे,तर 14 डिसेंबरला शेवटचे नाटक सादर होणार आहे.

राज्य नाट्य स्पर्धा मध्ये नाशिक विभाग केंद्रा करीता 33 प्रवेशिका दाखल प्राप्त आहे. त्यापैकी 29 नाटकांच सादरीकरण सादरीकरण होणार आहे. या वर्षी खुप मोठ्या प्रमाणात नाट्यसंस्था सहभागी होत असल्याने अंतिम फेरी करीता नाशिक विभागातून प्रथमच 3 नाटक पाठविले जाणार आहे.
करोना नंतर खुप मोठ्या प्रमाणात 1000 ते 1200 रंगकर्मी नाशिक विभागीय फेरी मध्ये सहभागी होत आहे. त्याच प्रमाणे नाट्यरसिक प्रेक्षकांनी सुद्धा मोठ्या संख्येने नाटकांचा आस्वाद घ्यावा अशी विनंती आयोजका च्या वतीने करतो आहे.

राजेश जाधव
(नाशिक विभाग समन्वयक )
राज्य नाट्य स्पर्धा

Previous articleओझोन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अकोला येथे ओझोन  वाचनालयाचे उदघाटन
Next articleपुलाचे काम निकृष्ट दर्जाचे