Home Breaking News हिमायतनगर शहरातील पेट्रोल पंपावर पेट्रोलची टंचाई!

हिमायतनगर शहरातील पेट्रोल पंपावर पेट्रोलची टंचाई!

जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 01 नोव्हेंबर 2022

हिमायतनगर तालुक्यातील नांदेड- किनवट महामार्गावर रोडवर असलेल्या दोन मुख्य पेट्रोल पंपावर अचानक दोन्ही पंपावर पेट्रोलची टंचाई निर्माण झाली. दुरवर जाणा-या दुचाकी-चारचाकी वाहनांना नाहक या पेट्रोल टंचाईचा सामना करावा लागला.
हिमायतनगर तालुक्याचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी आदरणीय गायकवाड यांच्याशी जिल्हा संपादक नांदेड यांनी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांनी भ्रमणध्वनी उचलला नाही. तहसीलदार यांच्या विशिष्ठ कोट्यातील शिल्लक पेट्रोल पंपावर नसेल, तर आश्चर्यच मानायला हरकत नाही.
रुग्णालयात जाणा-या रुग्णांसाठी शासकीय कोट्यातील पेट्रोल दिले तर कुठे बिघडले. अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करतांना, पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकणा-या मोटारसायकल स्वारांंनी खदखदून , अतिव दुःख व्यक्त करुन सांगितले.

Previous articleहिमायतनगर तालुका परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी ई- पीक नोंदणी करून घ्यावी – तहसीलदार डी.एन. गायकवाड
Next articleसवनेकरांचे ….लोणे, व भडंगे, यांच्या कामगीरी बाबत गावकऱ्यांनी काढले गौरव् उद्गार