नासीर शहा
पातूर तालुका प्रतिनिधी
पातुर तालुक्यातील पाडसिंगी येत शेतातील विहीरीत एका महिलेचा आपल्या चिमुकल्यासह मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली.
आज दिनांक 18/10/22 रोजी सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास पातुर तालुक्यातील पाडसिंगी येथे शेतातील विहीरीत एका महिला आपल्या चिमुकल्या बाळासह मृतावस्थेत पडून असल्याचे निदर्शनास आले.सदर माहिती चान्नी पोलिसांना मिळाल्यावरुन चान्नी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता शेतातील विहीरीत सदर महिला व तिचा चिमुकला मुलगा मृतावस्थेत असल्याचे आढळून आले. सदर मृतक महिला गोकुळ प्रदिप लटके (वय अंदाज 28 वर्षं) रा .पहडिंसागी व विर प्रदिप लटके(वय 1 वर्षं) असल्याचे निष्पन्न झाले असून ही महिला काल दि.17/10/2022 पासून बेपत्ता असल्याची तक्रार चान्नी पोलिसांत दाखल होत दरम्यान आज सकाळी नातेवाईकांनी परिसरात शोधाशोध घेतला असता सदर महिलेस दोन मुले असून मोठ मुलगा घरीच ठेवून छोटा मुलगा विर याला घेऊन विहिरी मध्ये आत्महत्या केल्याची प्रथमदर्शनी दिसत आहे .ही नेमकी आत्महत्या आहे की घातपात याकडे लक्ष पोलिसांचे लक्ष असून पोलिस त्या दिशेने तपास करीत आहेत. यावेळी चान्नी पोलिसा ठाण्याचे ठाणेदार योगेश वाघमारे अविनाश मोहिते. गणेश महाजन, पो.कॉ करवते योगेश डाबेराव ,शिंदे ,चव्हाण, गीते, विजय चोरपगार त्यांनी मृतदेह बाहेर काढून पंचनामा करून मर्ग दखल केली असून मृत्यूदेह उत्तरीय तपासणी करिता सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे पाठविला . अधिक तपास चान्नी पोलीस करत आहे .