शेगाव प्रतिनिधी /
शेगाव येथील महाराष्ट्र भर पर्यावरण.तथा भूमीराजा,या वेबपोर्टलच्या अँंकर विविध क्षेत्रात नेत्रदिप यशस्वी पणे सतत काम करणाऱ्या शितल ताई शेगोकार यांचा नुकताच 14 आँक्टोबंर रोजी वाढदिवस विविध संघटनांनी साजरा केला.त्यामधे
शेगाव येथील रेल्वे स्थानक परिसर येथे ताईंच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. शेगाव येथील नामांकित डॉक्टर कलावती सर. यांच्या रुग्णालय परिसरामध्ये ताईंच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच शेगाव येथील मतिमंद निवासी विद्यालय येथे मुलांना नाश्ता वाटप करून त्यांनी मुलांच्या सोबत केक कापुन आणि वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा केला. भीम नगर परिसरातील अंगणवाडी येथे त्यांनी वृक्षारोपण करून वृक्षारोपण काळाची गरज असा संदेश प्रत्येक ठिकाणी जनजागृतीच्या द्वारे केला या कार्यक्रमाला
भीम नगर परिसरातील वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष प्रवीण सर बोदडे क्षितिज, निर्वाण, संदेश शेगोकार, आणी पक्षाचे सर्वच कार्यकर्त्यांनी ताईंच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण केले.
मनाने हजर असणारे पी एम पुंडकर, स्टेशन प्रबंधक आणि मोहन देशपांडे ट्राफिक निरिक्षक , राजेश देशपांडे, अनिलकुमार, भीका बनकर, प्रीतम खाड़े, श्रीकांत वानखड़े
आदि हजर होते.