अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी
खामगाव:-सध्या स्पर्धेच्या युगात आज नोकरी मिळणे दुरापास्त झालेले आहे हुशार व गुणवंत विद्यार्थ्यांनाच नोकरी लागण्याची शास्वती आहे त्याकरिता मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांनी व युवकांनी व्यावसायिक शिक्षण घेऊन उद्योग धंद्याकडे वळावे असे अनमोल विचार मातंग समाजाचे विचारवंत ज्ञानदेवराव मानवतकर सर यांनी मातंग समाजाच्या युवकांना मार्गदरशन केले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरम बुलढाणा जिल्हा उत्तर तर्फे दिनांक 2 ऑक्टोबर 2022 पासून राबविण्यात येत असलेल्या मातंग समाज संपर्क व संवाद अभियाना अंतर्गत दिनांक 9 ऑक्टोबर 2022 रोजी पिंपळगाव राजा ता.खामगाव येथे जाहीर सभा घेण्यात आली सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते आत्माराम वानखडे होते याप्रसंगी मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते अण्णाभाऊ साठे पुरस्कारार्थी संतारामजी तायडे यांनी मार्गदर्शन केले व युवा उद्योजक शंकरराव मानवतकर यांनी युवकांना व्यवसाय बद्दल माहिती दिली सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे जिल्हा कार्याध्यक्ष गजानन सोनवणे यांनी केले व संचालन युवा आघाडी जिल्हाध्यक्ष कृष्णा नाटेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवाजी बोदडे यांनी केले याप्रसंगी दादाराव वानखडे गजानन पाटोळे सहदेव चंदनशिव अशोक पाटोळे दिलीप पाटोळे राजारामजी नाडे पवन पाटोळे शुभम खिल्लारे व आदीसह मातंग समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते