Home Breaking News शेतकऱ्यांची सतत सेवा करुन लोकप्रियता मिळविणारे टारफे.. कर्तव्यदक्ष अधिकारी होते.

शेतकऱ्यांची सतत सेवा करुन लोकप्रियता मिळविणारे टारफे.. कर्तव्यदक्ष अधिकारी होते.

👉जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी रविशंकर चलवदे यांचे प्रतिपादन.

जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 03 सप्टेंबर 2022

हिमायतनगर येथील तालुका कृषी कार्यालय येथे 30 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झालेले मंडळ कृषी अधिकारी जि. के. टारफे यांनी रेगुलर कार्यालयात बसुन शेतकऱ्यांना नेहमी मार्गदर्शन करत होते. म्हणुन ते शेतकऱ्यांच्या नेहमीच आठवणीत राहतील. आपल्या कामात सतत सातत्य ठेवुन त्यांनी वरीष्ठ अधिकारीच्या ते कौतुकास पात्र होते. म्हणुन त्यांनी ऐवढी लोकप्रियता मिळवली आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी नवनविन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. कृषि विभागाच्या विविध योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. असेही ते म्हणाले.
आपली निस्वार्थपणे सेवा देऊन त्यांच्या मातोश्रीच्या समोर टारफे साहेबांचा सेवानिवृत्त प्रसंगी हा अतिशय आनंदाचा क्षण आहे.
यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी रणविर साहेब, मंडळ कृषी अधिकारी किनवट शैनैवाड साहेब, मंडळ कृषी अधिकारी हदगाव दिलीप जाधव साहेब, मा. पं. समिती सदस्य बालाजी राठोड, पत्रकार अनगुलवारसर, कृषि सहाय्यक कोटुलवार, ढगे मॅडम, सचिन घुले आदींची समयोचित भाषणे झाली.
यावेळी कर्मचारी, शेतकरी बांधव उपस्थित होते. सुत्रसंचलन व आभार कृषि मित्र तथा पत्रकार मारोती अक्कलवाड पा. सवनेकर यांनी केले आहे.

Previous articleशिवसेना व युवासेना (शिंदे गट)बाळापूर च्या वतीने आरोग्य शिबिर संपन्न
Next articleमृत जनावरे रस्त्यांत टाकल्यामुळे प्रवाशांना दुर्गंधीचा होतोय त्रास.