अंगद सुरोशे हिमायतनगर/प्रतिनीधी
हदगाव – हिमायतनगर विधानसभा मतदार संघात बाबुराव या नावाने परिचित आसलेले गोरगरीब ,शेतकरी, शेतमजुर यांच्या एका हाकेला धावुन जाणारे लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रयत्नाने कारला (पी) येथील सिंगल फेज डि. पी. व 100 चा ए.जी . या दोन्ही डि. पी. चा प्रश्न सुटला अनेक दिवसापासुन कारला येथील गावठाण लगत असलेला 100 ए. जी. डि. पी. नादुरुस्त असल्यामुळे जनावराच्या पिण्याच्या पाण्याची तसेच शेतकर्यांच्या पिकासाठी लाईट आभावी पाण्याची मोठी टंचाई होत असल्याने कारला येथील शेतकरी हतबल होत असतांनाच कोहळीकर यांनी पुढाकार घेउन कारला गावात तीन सिंगल फेज डि. पी. व एक 100 चा गावठाण ए. जी. डि. पी. उपलब्ध करुन दिला शेतकर्यांनी कोहळीकर यांच्याशी संपर्क साधला असता कोहळीकर यांनी थेट भोकर सबटेशन येथील तंबाखू साहेब व मोरे यांच्याशी संपर्क साधून दोन्ही डि. पी. उपलब्ध करुन दिले असल्याचे कारला येथील शेतकर्यांनी सांगितले.