हिमायतनगर/- कृष्णा राठोड
तालुक्यातील मोजे डोल्हारी येथील बापूराव गणपत भट्टेवाड राहणार डोलारी तालुका हिमायतनगर येथील रहिवासी वय 47 वर्षी हे दररोजच्या प्रमाणे आपण रोजगार रोजंदारीवर काम करण्यासाठी डोलारी येथील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोयाबीनची फवारणी करण्यासाठी गेले असता अंदाजे सकाळी साडेदहा ते अकराच्या दरम्यान त्यांना विषारी सापाने चावा घेऊन याने त्यांना हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले असता डॉक्टर यांनी त्यांना मुर्त्यू झाल्याचे घोषित केले त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुलं असा परिवार असून आहे डोल्हारी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ही दुःखाची बातमी कळताच हिमायतनगर तालुक्यातील गणेश भक्तांना भेटण्यासाठी आलेल्या लोकनेते बाबुराव कोहळीकर यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन मायाताच्या मुर्त्यू विषयी डॉक्टरांशी विचारपूस करून उपस्थित भट्टेवाढ परिवारांचे सांत्वन केले.