भूमीराजा न्यूज
प्रतिनिधी/संतोष मोरे बाळापूर
निंबाफाटा :- बाळापूर तालुक्यातील मुख्य स्रोत निंबाफाटा येथिल वंचित बहुजन आघाडी च्या कार्यालयाचे उद्घाटन धैर्यवर्धन पुंडकर व जिल्हा अध्यक्ष प्रमोद देंडवे, गव्हाणकर, बावणे, लिनाताई शेगोकार, रुपालीताई गवई, एल.के. डोंगरे, गजानन उगले,यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवराव वानखडे व प्रास्ताविक राजुभाऊ मोरे,यांनी केले. तर आभार प्रदर्शन सुनिल मोरे यांनी केले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत म्हणून धैर्यवर्धन पुंडकर, प्रमोद देंडवे, गव्हाणकर, एल.के .डोंगरे, गजानन उगले, फाटे, मीनाताई बावणे, लिनाताई शेगोकार, रुपालीताई गवई,अम्रपाली खंडारे, प्रगती दांदडे,ज्ञानेश्वर सुलताने,प्रदिप शिरसाट, भारत निखाडे, सिद्धार्थ मामा, ईदुबाई वानखडे होते. या कार्यक्रमांच्या वेळी उपस्थित शेकिल देशमुख, सलिम देशमुख,लोहारा येथील सरपंच प्रविण मोरे,दिलीप सरदार, तानाजी मोरे,घाटे, शुभाष तायडे,रामराव सावळे, पाचपोहे, देवेंद्र शेगोकार, सहदेव भटकर, महादेव घ्यारे,पवण, डोंगरे, चेतन डोंगरे, भास्कर डोंगरे, संजय इंगळे, देवेंद्र पाटील, जनार्दन साबळे, एसकुमार ट्रेलर, धम्मापाल मोरे,शबदर पटेल, पञकार संतोष मोरे, अनिल मोरे,संदेश मोरे,व वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा अध्यक्ष प्रमोद देंडवे यांनी या पक्ष कार्यालयाचे प्रमुख रविंद्र सरदार यांना केले. तसेच या परिसरातील नागरिकांना कोणत्याही शासकीय, दवाखानाचे कामे असल्याच कार्यालयात संपर्क साधून समस्याचे निवारण केले जाई असे सांगितले.