Home Breaking News हिमायतनगर पोलीसांनी केले शहरात पथसंचलन.

हिमायतनगर पोलीसांनी केले शहरात पथसंचलन.

👉🏻रूट मार्च करून शांतता कायम ठेवण्याचे नागरिकांना आव्हान

अंगद सुरोशे हिमायतनगर/ प्रतिनिधी – गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिनांक 31 ऑगस्ट 2022 रोजी कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक बी. डी. भूसणुर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर पोलिसांनी पथ संचलन करून उत्सव काळात नागरिकांनी नियमांचे पालन करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले

कोरोना महामारीला रोखण्यासाठी शासनाने मागील काळात ताळेबंदी घोषित केली असल्याने गेल्या दोन वर्षांपासून सार्वजनिक गणेश उत्सव आनंदात साजरा करण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. त्यामूळे गणेश भक्तांच्या आनंदावर विरजण पडले होते. परंतु शासनाने ह्या वर्षी निर्बंध पूर्णताहा हटविल्याने यावर्षीचा सार्वजनिक गणेश उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जाणार असून तो शांततेत साजरे पार पाडावे या काळात शहरासह तालुक्यातील कायदा, सुव्यवस्था, शांतता अबाधीत राखण्यासाठी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हिमायतनगर पोलीस प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असून नागरिकांमध्ये जाग्रुकता निर्माण व्हावी यासाठी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दि 31 ऑगस्ट रोजी पोलीस निरीक्षक बि. डी. भूसनुर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी यांनी शहरातील प्रमुख मार्गावर सर्व पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांना घेऊन पथसंचलन केले यावेळी गणेश उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक भुसनुर, स.पो.नि.बालाजी महाजन, नंदलाल चौधरी यांनी केले या पथसंचलनात तिन अधिकारी,पोलीस अमलदार व ग्रुहरक्षक दलाचे जवान सहभागी झाले होते.

Previous articleसाहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लोकस्वराज्य आंदोलनाच्या पोटा बु.येथे ‘गाव शाखा फलकाचे” उद्घाटन व अनावरण..
Next articleकासारखेड रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर कारवाईचे अप्पर पोलीस अधिक्षकांचे आदेश