Home Breaking News पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेची राज्यभर संघटनात्मक बांधणी करणार.

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेची राज्यभर संघटनात्मक बांधणी करणार.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक -25 आॅगष्ट 2022

👉 महसूल,पशुंसवर्धन, दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा.

प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांचे प्रतिपादन.

मागील अनेक वर्षापासून शेतकऱ्याची हक्काची संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेची, राज्यभरात लवकरच पुनर्बांधणी करून, पदाधिकाऱ्यांच्या निवडी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे. अशी माहिती पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी दिली आहे.

गेल्या बारा वर्षापासून नांदेडसह राज्यभरात शेतकरी दिनानिमांत्ताने शेतकऱ्यांसाठी मेळावे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून, शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी शासन दरबारी आवाज उठवणारी संघटना म्हणून पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेकडे पाहिले जाते, नांदेड जिल्ह्यामध्ये पिकविमा पिक कर्ज, बी बियाणे याची जनजागृती व शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी पहिल्यांदा आवाज उठवण्याचे काम आजवर पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेने केले आहे ,संघटनेच्या बांधणीसाठी नांदेडसह महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्षच्या व राज्य कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी लवकरच राज्याचे महसूल, दुग्धविकास,पशुंसवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात करून संघटनेचे जाळे राज्यभर निर्माण करून विस्तार करणार असल्याचेही शेवटी भागवत देवसरकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले. लवकरच नांदेड जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष याच्या निवडीकरून पुढील महिन्यात राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा तामसा किंवा हदगाव येथे नागरी सत्कार सोहळा व शेतकरी मेळावा, आयोजित करणार असल्याचेही भागवत देवसरकर यांनी सांगितले आहे.

Previous articleवन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात मृत पावलेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या कुटूंबियांना आता २० लक्ष रू. अर्थसहाय्य मिळणार*
Next articleजनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारे तहसीलदार गायकवाड पुन्हा सेवेत रुजू!