पिकांवर का? आवश्यक आहे. श्रावणी अमावस्या फवारणी.
@ कृषि वार्तापत्र @
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
आला पोळा कपाशी सांभाळा … हे वाडवडील सांगून गेले. श्रावणी अमावस्या म्हणजेच पोळा अमावस्या फवारणी आणि कापूस व इतर पिकांवर रोगराई, गुलाबी बोंड अळी व इतर अळी प्रादुर्भाव यांचे जुने नाते आहे. त्यामुळेच का आवश्यक आहे श्रावणी अमावस्या फवारणी आणि आपल्या पिकांची काळजी, अमावस्येचे पीक व्यवस्थापन हे पोळा सण काळात कसे करावे, ते आपण जाणून घेऊ.
कापूस फवारणी आणि अमावस्या यांचे खूपच जुने नाते आहे. आपल्या चार पिढ्यांना अनुभवातून पोळ्याला फवारणी करायची असते हे माहिती आहे. गेले अनेक वर्षे गावागावात ते पथ्य पाळले जाते. अनेकांना असे का करावे, हे भलेही माहिती नसेल; पण तर ही परंपरा पाळतात. आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत या परंपरेमागील शास्त्र.आला पोळा कपाशी सांभाळा … हे वाडवडील सांगून गेले. श्रावणी अमावस्या म्हणजेच पोळा अमावस्या फवारणी आणि कापूस व इतर पिकांवर रोगराई, गुलाबी बोंड अळी व इतर अळी प्रादुर्भाव यांचे जुने नाते आहे. त्यामुळेच का आवश्यक आहे श्रावणी अमावस्या फवारणी आणि आपल्या पिकांची काळजी, अमावस्येचे पीक व्यवस्थापन हे पोळा सण काळात कसे करावे, ते आपण जाणून घेऊ.
कापूस फवारणी आणि अमावस्या यांचे खूपच जुने नाते आहे. आपल्या चार पिढ्यांना अनुभवातून पोळ्याला फवारणी करायची असते हे माहिती आहे. गेले अनेक वर्षे गावागावात ते पथ्य पाळले जाते. अनेकांना असे का करावे, हे भलेही माहिती नसेल; पण तर ही परंपरा पाळतात. आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत या परंपरेमागील शास्त्र.
आला पोळा कपाशी सांभाळा ही पोळा श्रावणी अमावस्या फवारणी कशासाठी?
अमावस्येच्या काळात नेमक्या अशा काय गोष्टी घडतात, की पिकांवर फवारणी आवश्यक ठरते. विशेषत: कपाशी, कापूस पिकाला तर ते फारच आवश्यक ठरते. कापूस पिकाच विचार घेतल्यास पोळ्याची अमावस्या अतिशय महत्त्वाची ठरते. यंदा शुक्रवार, 26 ऑगस्ट रोजी पोळा सण आहे. त्याच दिवशी श्रावणी अमावस्येचा मुहूर्त आहे. या अमावस्येला दर्श अमावस्या किंवा पिठोरी अमावस्या असेही म्हटले जाते. या अमावस्या काळातच कापसाला पातेधारणा होते, फुलधारणा सुरू होते. पेरणी काळानुसार काही शेतकऱ्यांच्या शेतात तर कपाशी लागायलासुद्धा सुरुवात झालेली असते. या काळात कपाशी व इतरही उगवण झालेली पीके रोगराईमुक्त ठेवणे अत्यंत आवश्यक असते. भाद्रपदाचे कडक उन्हं सुरू होण्यापूर्वी संततधार, उघडीप न देणाऱ्या पावसाच्या या श्रावणाच्या शेवटच्या काळात रोगराई मातू शकते.
आला पोळा कपाशी सांभाळा … हे वाडवडील सांगून गेले. श्रावणी अमावस्या म्हणजेच पोळा अमावस्या फवारणी आणि कापूस व इतर पिकांवर रोगराई, गुलाबी बोंड अळी व इतर अळी प्रादुर्भाव यांचे जुने नाते आहे. त्यामुळेच का आवश्यक आहे श्रावणी अमावस्या फवारणी आणि आपल्या पिकांची काळजी, अमावस्येचे पीक व्यवस्थापन हे पोळा सण काळात कसे करावे, ते आपण जाणून घेऊ.
कापूस फवारणी आणि अमावस्या यांचे खूपच जुने नाते आहे. आपल्या चार पिढ्यांना अनुभवातून पोळ्याला फवारणी करायची असते हे माहिती आहे. गेले अनेक वर्षे गावागावात ते पथ्य पाळले जाते. अनेकांना असे का करावे, हे भलेही माहिती नसेल; पण तर ही परंपरा पाळतात. आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत या परंपरेमागील शास्त्र.
आला पोळा कपाशी सांभाळा ही पोळा श्रावणी अमावस्या फवारणी कशासाठी?
अमावस्येच्या काळात नेमक्या अशा काय गोष्टी घडतात, की पिकांवर फवारणी आवश्यक ठरते. विशेषत: कपाशी, कापूस पिकाला तर ते फारच आवश्यक ठरते. कापूस पिकाच विचार घेतल्यास पोळ्याची अमावस्या अतिशय महत्त्वाची ठरते. यंदा शुक्रवार, 26 ऑगस्ट रोजी पोळा सण आहे. त्याच दिवशी श्रावणी अमावस्येचा मुहूर्त आहे. या अमावस्येला दर्श अमावस्या किंवा पिठोरी अमावस्या असेही म्हटले जाते. या अमावस्या काळातच कापसाला पातेधारणा होते, फुलधारणा सुरू होते. पेरणी काळानुसार काही शेतकऱ्यांच्या शेतात तर कपाशी लागायलासुद्धा सुरुवात झालेली असते. या काळात कपाशी व इतरही उगवण झालेली पीके रोगराईमुक्त ठेवणे अत्यंत आवश्यक असते. भाद्रपदाचे कडक उन्हं सुरू होण्यापूर्वी संततधार, उघडीप न देणाऱ्या पावसाच्या या श्रावणाच्या शेवटच्या काळात रोगराई मातू शकते. तिला नियंत्रण घालणे आवश्यक ठरते.
कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळी प्रादुर्भावास सुरुवात
पोळा अमावस्येच्या वेळीच कपाशी पिकावर फवारणी अतिशय महत्त्वाची असते. या फवारणीत नेमके कोणते कीटकनाशक आणि कोणती बुरशीनाशके व टॉनिक वापरणे गरजेचे आहे, तेही पाहणे आवश्यक आहे. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पोळा अमावस्येच्या रात्रीच्या दोन दिवस अगोदर व दोन दिवस नंतर कपाशीवर गुलाबी बोंडअळीचे पतंग मोठ्या प्रमाणावर अंडी घालतात. त्याचा परिणाम 5-6 दिवसांनी कापूस पिकावर दिसून येतो. यावेळी फुलाची डोमकळी म्हणजे न उमललेली कळी दिसू लागते.
फवारणी करताना कंपनीने सूचना दिल्यानुसारच औषधाचे प्रमाण ठेवावे. ते घटक कमी-जास्त करू नयेत. याशिवाय, फवारणीचे चांगले परिणाम दिसून येण्यासाठी सिलीकॉन बेस स्टिकर अतिशय उपयुक्त ठरू शकते. फवारणीसाठी खूप दिवस साठवून ठेवलेले किंवा पावसाचे पाणी मुळीच वापरू नये.
बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस पिकाच्या उत्पादनात तब्बल 40 ते 50 टक्क्यापर्यत नुकसान होऊ शकते. त्यामुळे हे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पोळ्याच्या अमावस्येची फवारणी करणे अतिशय जरुरीचे आहे. त्यामागे अनेक वर्षांची परंपरा आहेच; पण कृषी विद्यापीठांनी सांगितलेले शास्त्रही आहे…
( संकलन- कल्याण वानखेडे कृषि मित्र पळसपुर )