Home Breaking News हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी तांडा येथे बंजारा तीज महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा..

हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी तांडा येथे बंजारा तीज महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा..

👉🏻गोरसेनेची बंजारा प्रचारीका बालिका दीक्षा कडावत यांची प्रमुख उपस्थिती…!

भूमीराजा न्यूज,शहर प्रतिनिधी कृष्णा राठोड -9145043381

हिमायतनगर/-
तालुक्यातील बोरगडी तांडा येथे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी माता जगदंबा च्या कृपेने, संत सेवालाल महाराजांच्या आशीर्वादाने दरवर्षी तीज उत्सवाचे आयोजन केले जाते, यावर्षी ही बोरगडी तांडा येथे तीज महोत्सव आयोजित करण्यात आले आहे.
या तिज महोत्सव अकरा दिवसांचा आयोजित करण्यात आला होता.
या अकरा दिवसांमध्ये गावातील सर्व महिला व पुरुषांनी या माता जगदंबा ची तीजेची पूजा-अर्चना केली जाते. अखेर आज तीच महोत्सवाचा विसर्जन करण्यात आले.
त्यावेळेस गोर बंजारा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता व त्या ठिकाणी बाल वक्ते यवतमाळ येथील दिशा कडावत यांनी बोरगडी तांडा येथील समाज बांधवांना संबोधित केले.

गोर बंजारा समाजामध्ये तीच उत्सव म्हणजे मागील 7000 वर्ष पूर्वीपासून गोर बंजारा समाज तीच उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो सिंधू घाटी मोहन जोदारो हरप्पा येथून तीज महोत्सव साजरा करण्याचा निर्धार गोर बंजारा समाजाने घेतला होता. आजही भारतातील गोर बंजारा समाज तीज उत्सव साजरा करतो सिंधू संस्कृती ला जपत प्रत्येक तांडा वाडी मध्ये हा सण साजरा करण्यात येते तीज महानजे एका दुरडीमध्ये गहू टाकून नऊ दिवसाचे नंतर त्या ठिकाणी गावातील तरुणी व वेगवेगळ्या तांड्यातील तरुणींना त्या सणाचा मोठ्या उत्साहाने तिज हा सण साजरा केला जातो .त्याचप्रमाणे आज हिमायतनगर तालुक्यामध्ये गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये बोरगडी तांडा येते बाल वक्ते दिशा कडावत यांनी बोरगडी तांडा वाशीयांना संबोधित केले त्यावेळेस गावातील नायक, कारभारी, डाओ, सानों, हसाबी, नसाबी,पुजारी,व महिलावर्ग व, गोरसेनेचे लावा-लष्कर कर गावातील सर्वच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गोरसेना हिमायतनगर संपूर्ण टीम त्या कार्यक्रमास हजेरी लावली व संघटना बांधण्याची चर्चा ही केले. त्यावेळेस गोर सेना तालुका अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी अशाच पद्धतीने पुढेही भरभरून प्रतिसाद द्यावे व समाजामध्ये रूढी परंपरा धाटी जपून ठेवावे व गोर बंजारा समाजाचे तीज सना सारखे गोर बंजारा समाजातील सर्वच नागरिकांनी हा उत्सव सन साजरा करावे असे त्यांनी यावेळी सांगितले. या
कार्यक्रम चे सूत्रसंचालन
गोर सेनेचे तालुका शो.मि प्रसिद्धी प्रमुख पत्रकार कृष्णा राठोड यांनी केले.

Previous articleडाॕ. अ. ना. रसनकुटे यांच्या हस्ते काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न
Next articleधनगर समाजातील मुलांसाठी शासकिय वसतिगृह शिंदे सरकारचा स्तुत्य निर्णय