Home Breaking News पक्या रस्त्यासहित स्मशानभूमीत शेडसाठी निधी उपलब्ध करून द्या..

पक्या रस्त्यासहित स्मशानभूमीत शेडसाठी निधी उपलब्ध करून द्या..

👉 सरपंच प्रल्हाद पाटील टेंभुर्णीकर यांची मागणी..

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक -18 आॅगष्ट 2022

देशाला 75 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळुन अमृत महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा झाला. परंतु खरा विकास झाला आहे का? असा प्रतिप्रश्न सवना ज. येथील सरपंच परमेश्वर गोपतवाड यांनी विचारला आहे. पावसाळ्यात एखाद्या आदिवासी व्यक्ती मयत झाला असता, तर स्मशानभूमी नसल्याने त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी तब्बल तीन तास थांबवावे लागते. यापेक्षा दुसरे दुर्दैव कोणते असु शकते. यासाठी शासनाने स्मशानभूमी कडे जाणारा पक्का रस्ता बनवुन, प्रत्येक गावातील स्मशानभूमीत शेड उभारण्यात यावे. असे प्रतिपादन टेंभुर्णी येथील सरपंच प्रल्हाद पाटील टेंभुर्णीकर आणि सवना येथील सरपंच परमेश्वर गोपतवाड यांनी सामुहिक मागणी सरकारकडे केली आहे.

Previous articleस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सनशाईन स्टार किड्स मार्फत मेडिकल व हेल्थ चेकअप कॅम्प घेण्यात आला.
Next articleवडगाव येथील रस्त्याचे बोगस झालेले पेव्हर ब्लॅक चे काम ठेकेदारा कडून पुन्हा करून न घेतल्यास