नासिर शहा
पातूर तालुका प्रतिनिधी
पिंपळखुटा : दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2022 यादरम्यान घरोघरी तिरंगा अंतर्गत हर घर तिरंगा या अभियानात राज्यातील सर्व नागरिकांनी शामिल व्हावे 75 व्या अमृतमहोत्सवा निम्मित दी पि ई एस विद्यालय तेसेच जी प प्राथमिक केंद्रीय शाळा यांच्या नियोजनाने घरोघरी तिरंगा लावावा असे संबोधित करत पूर्ण गावात फेरी मारत चांगल्याच घोषणा देत विद्यार्थ्यांनी आकर्षित केले दोन्ही शाळेचे सर्व शिक्षक व कर्मचारी (पत्रकार) राहुल देशमुख, कपिल खरप,शेख महेबुब व चान्नी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक गणेश महाजन उपनिरीक्षक अविनाश मोहिते तसेच पोलीस अधिकारी दत्ता हिंगणे, सुधाकर करवते, महादेव देशमुख, भगवान शिंदे,योगेश डाबेराव,प्रवीण सोनेने,रवी गुघे,आदी उपस्थित होते